श्री सप्तशृंगी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न

श्री सप्तशृंगी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न

डांगसौंदाणे येथील श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे तालुका बागलाण, जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फर सोसायटीचे सरचिटणीस श्री सुशील कुमार संजय सोनवणे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट दादाजी वामन आहेर व प्राध्यापिका सौ.पूजा संजय अहिरे उपस्थित होत्या. अँड. दादाजी आहेर यांनी मुलींना महिला सक्षमीकरण व कायद्याची सविस्तर माहिती दिली. वेगवेगळ्या महिलांच्या हिंसाचाराच्या विरोधात असलेले वागणे व तरतुदी याबद्दल माहिती दिली प्राध्यापिका सौ.पूजा संजय आहेरे यांनी महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले संधीची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी.एम जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्राध्यापिका प्रियंका खैरणार यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. आर.डी नाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले यानंतर मुलींना संरक्षणाचे धडे देण्यात आले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते