निफाड महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा...

निफाड महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा...

ग्रंथ हे ज्ञान माहिती देत असतात ग्रंथातूनच प्रेरणा मिळत असते विविध आत्मचरित्र चरित्र ऐतिहासिक ग्रंथ विज्ञान विषय ग्रंथ माहिती तंत्रज्ञान या सगळ्याच ज्ञान ग्रंथरूपाने आपल्याला वाचायला मिळते म्हणून आयुष्याला दिशा मिळण्यासाठी ग्रंथ हे एका मार्गदर्शकासारखे काम करीत असतात म्हणून प्रत्येकाने नियमित वाचन केलं पाहिजे असे मत प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी व्यक्त केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्र विभागातर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन समारंभ प्रसंगी बुधवार (दिनांक २३ एप्रिल )ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा डॉ प्रवीण ढेपले ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा दिपाली शेंडे,श्री राजेंद्र मत्सागर आदी उपस्थित होते
प्राचार्य ज्ञानोबा ढगे  पुढे म्हणाले की यावर्षीचा जागतिक ग्रंथ दिनाचा विषय 'रीड युवर वे' म्हणजेच आवडेल ते वाचा याविषयी माहिती देताना, विद्यार्थ्यांनी प्रथमतः वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वर्तमानपत्रातील छोट्या, मोठ्या बातम्या वाचायला सुरुवात करा, विषय तज्ञ संपादकीय लेख वाचा. मोबाईल च्या डिजिटल युगात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्येच निश्चित आहेच, फक्त वाचनाकडे एक पाऊल टाकण्याची कृती व मानसिक तयारी सर्वांनी या निमित्ताने करावी आणि ग्रंथालयीन पुस्तकांचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी महाविद्यालय ग्रंथालयात संदर्भ व क्रमिक पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल प्रा दिपाली  शेंडे यांनी केले तर आभार राजेंद्र मत्सागर यांनी मानले
 या वेळी डॉ. प्रवीण ढेपले, प्रा. बी.बी. मुंतोडे, प्रा श्रद्धा गवळी, डॉ. महेश बनकर, श्री एस. डी. गायकवाड सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते