सायखेडा महाविद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ...
मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री स्वामी षट्कोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा येथे आज दिनांक 21 जून रोजी अकरावा "आंतरराष्ट्रीय योग दिन" राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयीन क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. खालकर, उपप्राचार्य डाँ. सचिन गोसावी महाविद्यालयीन क्रीडा संचालक डॉ. सुनील धोंडगे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. अभिन पोटे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. डी. काजळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग दिन कार्यक्रमात क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सुनील धोंडगे यांनी प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात योगासने, अनुलोम - विलोम प्राणायाम यासारखे इतर अनेक आसणे सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून उत्साही वातावरणात करून घेतली.
योगासनांचा प्रात्यक्षिके झाल्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल, नाशिक यांच्या मार्फत "निरोगी आयुष्य व मोफत नाडी परीक्षण शिबिर" घेण्यात आले. यावेळी आयुर्वेद तज्ञ डॉ. प्रणाली पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. खालकर यांनी केले. त्याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संदेश देताना सांगितले की, भारत हा "जागतिक योगगुरु" आहेत. योगाच्या माध्यमातून आपण स्वतः देखील निरोगी राहतो व इतरांना निरोगी राहण्यास प्रेरित करू शकतो. सातत्यपूर्ण योगाद्वारे आपण आपले कठीण ध्येय देखील सहज सध्या करू शकतो. वरील शिबिराकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व इतर सर्व कर्मचारी यांनी आपले नाडी परीक्षण करून घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनाकरिता महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.