व्ही एन नाईक महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

क्रां.वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित,क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर व सक्सेस जॉब प्लेसमेंट , सिन्नर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले यात २० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. यावेळी विविध कंपन्याचे मॅनेजर, एच आर मॅनेजर तसेच सक्सेस जॉब प्लेसमेंट चे संचालक श्री गणेश आव्हाड व सर्व टिम आदि महाविद्यालयात उपस्थित होते. प्रामुख्याने महाविद्यालयातील बी ए/ बी कॉम/बी एससी यातील कोणत्याही विषयामध्ये पदवी पुर्ण असणारे आणि शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखत देऊन नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी पहिला टप्पा पूर्ण केला. अनेक नामांकित व अग्रगण्य प्रायव्हेट कंपन्यां मध्ये खालील पदासाठी इंटरव्ह्यू घेण्यात आले.
कॉम्प्युटर ऑपेटर, अकाउंट ऑफिसर / असिस्टंट, सीए असिस्टंट,एच आर ऑफिसर / असिस्टंट ,डाटा एंट्री ऑपरेटर,ऑफिस असिस्टंट, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर,सेल्स & मार्केटिंग ऑफिसर / मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलर ,क्वालिटी डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट,मशीन ऑपरेटर ,रेसर्च & डेव्लोप्मेंट / QC / QA / RA / NPD इत्यादी.
अशा अनेक पदासाठी खालील क्षेत्रातील कंपनीचा समावेश होता
फार्मा , केमिकल इंजिनिअरिंग , ऑटोमोबाईल सर्व्हिस इंडस्ट्री, बँकिंग, आय टी, शिक्षण शेत्रात,
अशा अनेक कंपन्यामध्ये जॉब ची सुवर्णसंधी सिन्नर / नाशिक / मुंबई / पुणे / गुजरात इत्यादी ठिकाणी मिळाली.
मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मा. प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी आव्हान केले व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ किशोर पखाले आय क्यू ए सी समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर चकोर प्रा. संतोष आव्हाड प्रा. पूनम कुटे डॉ मंगल सांगळे डॉ ज्योती गायकवाड प्रा. अमोल आव्हाड शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.