नाशिकरोड करांच्या समस्या फक्त कागदावर, नाचवले जाताय कागदी घोडे!

नाशिक रोड, जेलरोड परिसरातील दैनंदिन समस्यांचे निराकरण याबाबत महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांना उत्तुंग झेप चे अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा (बुद्धीजीवी प्रकोष्ठ) रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वात उत्तुंग झेप च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन नाशिकरोड करांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले.
जानेवारीत नाशिक रोड, जेलरोड परिसरातील विविध गंभीर समस्यांबद्दल वि.अधिकारी ना. रोड यांच्या दालनात विविध विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी यांच्या समवेत बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करून घेणे बाबत बैठक संपन्न झाली.
परंतू संबंधित विभागाने प्राधान्याने कामकाज सूरु करणे बाबत मा. विभागीय अधिकारी यांना स्पष्ट लेखी निर्देश देऊनही कोणत्याही विभागाचे कामकाज सुरू न झाल्याने उत्तुंग झेप फाउंडेशन तर्फे पुनश्चन निवेदन देण्यात येऊन कामकाज पूर्ततेबाबत स्मरणपत्र व विनंती करण्यात आली. विभागीय अधिकारी यांना पुनश्च निर्देश देऊनही आजतागत कोणतेही कामाची पूर्तता नाही. किंबहुना सुरुवातही केली गेली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यावर केवळ स्मरणपत्र देऊन टोलवाटोलवी केली जात आहे.
एखाद्या कामाबाबत संबधित अधिकारी यांची समक्ष भेट घेतल्यास हे काम आमचे नाही अन्य विभागाचे आहे असे सांगून बोळवण केली जाते. यासंदर्भात नागरिकांना दैनंदिन येणाऱ्या अडचणी स्वतंत्रपणे निवेदनात नमूद केलेल्या आहेत."प्रत्यक्षात काम कमी" पण "कागदी घोडे" नाचवले जात असल्याची तक्रार आयुक्तासमोर शिष्टमंडळाने केली. फेब्रुवारी अखेर कामकाजाची पूर्तता होईल अशी हमी आयुक्ताने शिष्टमंडळाला दिली.
यावेळी अध्यक्ष रोहन देशपांडे,प्रकाश जमधडे, हेमंत गाडे, संजय पगारे,ओंकार काकळीज, राजेंद्र निगळ, प्रियांका पटेल, अथर्व पाठक, वनिता मोरे आदी उपस्थित होते. यावेळी वेळेत कामांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.