येथील मविप्र संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे आणि शिक्षणाधिकारी प्रा डॉ. नितीन जाधव यांनी विकसित केलेल्या मतदान प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यासाठीचे ब्लॉकचेन ट्रॅकर डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहे. मतदान प्रक्रियेत ब्लॉकचेनच्या वापरामुळे निवडणुकीची सुरक्षितता व पारदर्शकता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तसेच ही प्रणाली अन्न व कृषी क्षेत्र, औषध व आरोग्य सेवा, उद्योग व उत्पादन, हिऱ्यांचा व्यापार, लॉजिस्टिक्स व वाहतूक, आणि सरकारी पुरवठा योजना यांसारख्या क्षेत्रांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
याबरोबरच पुरवठा साखळीतील उत्पादने किंवा वस्तू त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात सुरक्षित ट्रॅकिंग आणि ट्रेसेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त आहे.
*ब्लॉकचेन पुरवठा ट्रॅकरची वैशिष्ट्ये:*
* सुरक्षित आणि पारदर्शक ट्रॅकिंगसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान
* रिअल-टाइम अपडेट्ससाठी वितरित लेजर सिस्टम
* एंड-टू-एंड दृश्यमानता आणि ट्रेसेबिलिटी
*मतदान प्रणालींमध्ये संभाव्य उपयोग:*
ब्लॉकचेन पुरवठा ट्रॅकर मतदान प्रणालींमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. विशेषतः मतपत्रिका, मतदान यंत्रे आणि निवडणूक साहित्यांच्या सुरक्षित ट्रॅकिंग व पडताळणीसाठी त्याचा वापर होऊ शकतो.
*मतपत्रिका ट्रॅकिंग:* मतदान प्रक्रियेदरम्यान मतपत्रिकांची अखंडता व सत्यता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन वापरता येईल.मतदान यंत्र पडताळणी: मतदान यंत्रांची छेडछाड व फेरफार रोखण्यासाठी ब्लॉकचेन-आधारित ट्रॅकिंग प्रभावी ठरू शकते.
*निवडणूक साहित्य व्यवस्थापन:* मतपत्रिका, मतदान यंत्रे व इतर निवडणूक साहित्याचा सुरक्षित साठवणूक व वाहतूक व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेनचा उपयोग करता येईल.
*ऑडिट ट्रेल:* मतदानाशी संबंधित सर्व क्रियाकलापांचे पारदर्शक आणि पडताळणीयोग्य ट्रॅकिंग करण्यासाठी अपरिवर्तनीय ऑडिट ट्रेल तयार करता येईल.
*मविप्र तर्फे सत्कार*
पेटंट मिळाल्याबद्दल संस्थेचे मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक मंडळातर्फे डॉ. ज्ञानोबा ढगे आणि डॉ. नितीन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभाताई बोरस्ते, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मोरे, सुनील पाटील, उपप्राचार्य दिलीप माळोदे, आयक्यूएसी समन्वयक भगवान कडलग, नॅक समन्वयक डॉ. एन. यू. पाटील, कार्यालयीन अधीक्षक आनंदा पवार आदींसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.