स्वजीवी महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सुशील मुणगेकरांची तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा संपन्न

स्वजीवी महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सुशील मुणगेकरांची  तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा संपन्न

"स्वजीवी महाराष्ट्र" उपक्रमांतर्गत स्टार्टअप मास्टर क्लास वर्कशॉप – प्रेरणादायी उद्योजकीय मार्गदर्शन

नाशिक क्लब येथे स्वजीवी महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या "Startup Blueprint Masterclass" या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी होण्याचा अत्यंत प्रेरणादायी अनुभव मिळाला.

ही कार्यशाळा ENpower – The Business School for Teens या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शक सुशील मुणगेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सुशील मुणगेकर सर गेली ७ वर्षे सात राज्यांतील शाळांमध्ये ८५०००+ विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देत आहेत. शालेय वयातच उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्याचा त्यांचा हा प्रयोग आज संपूर्ण देशात आदर्श ठरत आहे.

टाटा ग्रुपमध्ये उच्चपदस्थ नोकरी करत असतानाच त्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू करून, प्रत्यक्ष कृतीद्वारे तरुणांना प्रेरित केले आहे. या कार्यशाळेत त्यांनी स्टार्टअप सुरू करताना लागणारी पूर्वतयारी, विचारसरणी आणि सातत्य यावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यशाळा केवळ माहितीपूर्ण नव्हती, तर दृष्टिकोनात परिवर्तन करणारी ठरली.

मनोज मुखी सर, अमित रुपवते सर आणि  हार्मिक विनीत सातपुते यांच्या उपस्थितीमुळे हा अनुभव आणखी खास झाला.

या प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन नाशिकमध्ये केल्याबद्दल विनीत सातपुते यांनी नाशिककरांच्या वतीने विशेष आभार मानले.