निर्मिक सोशल फाउंडेशन च्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

गंधर्व नगरी नाशिक रोड येथील निर्मिक सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
निर्मिक सोशल फाउंडेशनच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी अकरा वाजता महात्मा फुले अभिवादन प्रसंगी नाशिक रोड येथील महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर महाजन, ज्येष्ठ नेते जयंत गाडेकर, शंकर शेठ औशीकर, संतोष भाऊ गाडेकर सुधाकर जाधव,अाकील काद्री संजय डहाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नेते जयंत गाडेकर, सागर महाजन शंकर शेठ औशीकर यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. निर्मिक सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी विजय बागुल यांनी या अभिवादन सभेचे प्रस्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ गाडेकर व निर्मित सोशल फाउंडेशन चे संतोष शेळके यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आपले विचार मांडले. तर निर्मिक सोशल फाउंडेशन चे सल्लागार विनीत सातपुते यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी निर्मिक सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अमित रूपवते सुभाष निकम अमोल बागुल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिखरेवाडी जॉगर्स क्लबचे ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकारी सुहास पवार विलास गांगुर्डे अरुण शेजवळ संजय शिरसाट यांनी या ठिकाणी भेट देऊन क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मित सोशल फाउंडेशन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप काळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.