अनुसूचित जमातींसाठी 45 दिवसीय निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन

अनुसूचित जमातींसाठी 45 दिवसीय निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन

त्र्यंबक विद्या मंदिर, नाशिक येथे अनुसूचित जमातींसाठी 45 दिवसीय निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन यशस्वीपणे पार पडले

दि. 11 जून 2025 रोजी त्र्यंबक विद्या मंदिर, नाशिक येथे केवळ अनुसूचित जमाती (ST) साठी आयोजित 45 दिवसीय निवासी 2 तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण (RTEDP) कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ श्री. आलोक मिश्रा , विभागीय संचालक , MCED यांच्या मार्गदर्शनाखाली  अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या प्रशिक्षणात दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे: 

  1. अ‍ॅडव्हान्स गारमेंट मेकिंग

  2. फूड व अ‍ॅग्रो प्रोसेसिंग

उद्घाटन समारंभास खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली:

  • श्री. राव सर, संचालक, AIRTEM, नाशिक

  • श्री. चाकोर सर, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक

  • श्री. अरुण पवार, प्रतिनिधी, TICCI, नाशिक

  • सौ. अनुराधा लोंढे, जिल्हा अग्रणी बँक, नाशिक

  • डॉ. अजय शेलोरकर, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक

  • सौ. आरती शेलोरकर, एमसीईडी, धुळे

  • श्री. सिद्धार्थ अहिरे, एमसीईडी, नंदुरबार

  • सौ. मोनाली चौहान, एमसीईडी, नाशिक

या प्रशिक्षणाद्वारे अनुसूचित जमातीतील युवक-युवतींना तांत्रिक कौशल्यांसह उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

या उपक्रमामुळे सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योग सुरु करण्यास व त्यांच्या कौशल्यांची व्यावसायिक पातळीवर उभारणी करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.