नाशिक महापालिकेत सेवा हक्क दिन उत्साहात साजरा; १२ उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या हस्ते गौरव.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज सेवा हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक महापालिकेद्वारे नागरिकांना ६६ विविध सेवा प्रभावीपणे पुरविल्या जातात. या सेवांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, २०२४-२५ या कालावधीतील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
राजीव गांधी भवनातील स्वागत कक्षात झालेल्या या कार्यक्रमात, आयुक्त मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क दिनाची शपथ घेतली. नागरिकांना जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा यावेळी संकल्प केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड, मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूड, नगर नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सेवा दिनाच्या शपथेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.
कार्यक्रमात विविध विभागांतील उत्कृष्ट १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. आयुक्त खत्री यांनी यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या सेवेत अधिक गती व परिणामकारकता आणण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नागरिक सेवा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्कअधिकारी योगेश कमोद यांनी केले.