दोन लाख किमतीच्या ४९ क्विंटल कांद्याची चोरी
साक्री तालुक्यातील घटना ; चोरट्याने गोदाम फोडून केली चोरी
पिंपळनेर: साक्री तालुक्यातील सामोडे येथील चोरटयांनी गोदाम फोडून दोन लाख रुपये किमतीचा ४९ क्विंटल कांदा लंपास केले, ही घटना समोर आली. तसेच पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या वेळी कांदा व्यापाऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
साक्री येथील रहिवासी तथा नवापूर येथील प्राथमिक शिक्षक हर्षवर्धन सोनवणे यांच्या पत्नी स्मिता सोनवणे यांच्या कांदा खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. सामोडे शिवारातील काट्याजवळ आदित्य ट्रेडिंग आशापुरी नावाच्या गोडाऊनमध्ये ठेवला होता. तेथे अनिल वानखडे हे देखरेखीचे काम करत असायचे. हे जेवणासाठी घरी गेले होते. त्यानंतर रात्रींतुन अज्ञात चोरट्यांनी (दि 29 ) रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास १४० गोण्यांमध्ये भरून ठेवलेला १ लाख ९६ हजार रुपयांचे कांदा चोरून नेला. कांदा चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी वाहनाचा वापर केला होता त्यानंतर कांद्याचे व्यापारी आले असता, कांदा चोरी झाल्याचे निदर्शनास आले.