बिटको महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक  वितरण सोहळा  उत्साहात संपन्न ......

बिटको महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक  वितरण सोहळा  उत्साहात संपन्न ......

नाशिकरोड:_  " उत्तम क्रीडा स्पर्धक होण्यासाठी फिजिकल फिटनेस उत्तम शरीरयष्टी असावी .नियमित आहार व व्यायाम त्याचप्रमाणे आपल्या खेळात सातत्य असावे .वेळोवेळी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करा. अंबर आणि आकाश  यांना झुकवण्याची शक्ती युवकांमध्ये, खेळाडूंमध्ये आहे. केवळ कळसाकडे न पाहता पायाकडे बघा. आज खेळाडूंसाठी शासनाने विविध सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. चुकांमधूनच शिकत आपल्या क्रीडा प्रकारात  पुढील स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करा व एकमेकांना प्रोत्साहन द्या, " असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले . 

            गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात  मंगळवार दि.२९ एप्रिल रोजी  जिमखाना हॉलमध्ये  ' वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ ' दिमाखात संपन्न झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होते .व्यासपीठावर   प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यासह कला शाखेचे  उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, क्रीडा शिक्षक धनंजय बर्वे, महेश थेटे , लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. धनंजय बर्वे  व श्री. महेश थेटे यांनी वरिष्ठ व कनिष्ठ  वार्षिक क्रीडा अहवाल  उपस्थितांसमोर सादर केला .याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वर्षभरातील विविध शालेय आंतरमहाविद्यालयीन ,विद्यापीठ व राष्ट्रीय  स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .  यावेळी उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची घोषणा करण्यात येउन यात कनिष्ठ गटातून  मनस्वी खर्डे हिस तर वरिष्ठ गटातून रेजनल आढाव यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

          उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे व सौ. सुनिता नेमाडे यांनीही सत्कारार्थी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करतांना खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सद्रूढ होऊन खेळ आपल्याला सशक्त बनवते असे सांगून आरोग्य हीच संपत्ती आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महेश थेटे यांनी केले तर आभार प्रा.धनंजय बर्वे यांनी मानले . कार्यक्रमास सौ. आर. एस. पाटील, राहुल पाटील, सुहास माळवे,  सायमा अन्सारी, संतोष गिरी, दिपांजली नायडू, राजेश होन, किरण पाटील, विठ्ठल जाधव व सत्कारार्थी विद्यार्थी आदी उपस्थित होते