अज्ञानाचा अंधार दूर करून नवराष्ट्र निर्मितीत महत्मा फुले यांचे योगदान महत्त्वाचे - प्रा. डॉ. विष्णू बोरसे

अज्ञानाचा अंधार दूर करून नवराष्ट्र निर्मितीत महत्मा फुले यांचे योगदान महत्त्वाचे - प्रा. डॉ. विष्णू बोरसे

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे महात्मा फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन

            रावळगाव: यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विष्णू बोरसे म्हणाले की, भारतामध्ये अनादिकालापासूनच अनिष्ट रूढी प्रथा-परंपरा कर्मकांड व वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. भारतीय समाज हा वर्णव्यवस्थेमध्ये विभागला गेला असल्यामुळे शिक्षणाचा अधिकार हा केवळ विशिष्ट वर्गातील पुरुषांकडेच होता. त्यामुळे समाजातील बहुसंख्याक समाज व स्त्रियां ह्या पूर्णपणे अज्ञानाच्या अंधारात कोंडवाड्याचे जीने जगत होता. महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी आणि स्त्रीयांसाठी शिक्षणाचे दारे खुली केली. त्यांनी आपल्या पत्नीला साक्षर करून महिला शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. १८४८ साली पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यात सावित्रीबाईना पहली महिला शिक्षिका केली, समाजाचा प्रचंड विरोध असताना ही फुले दाम्पत्यानी ज्ञानाची गंगा बहुजन समाजापर्यंत घेऊन जाण्याचे महान कार्य केले. त्यामुळे भारतीय समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करून भारतीय समाजास ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेवून जाण्याचे व नवराष्ट्र निर्मितीचे श्रेय महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यास जाते. असे प्रतिपादन प्रा. डॉ. विष्णू बोरसे यांनी केले.

           श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन, श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विष्णू बोरसे हे उपस्थित होते. यावेळी महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबादास पाचंगे यांनी, प्रास्ताविक प्रा. भरत आहेर यांनी केले, त्यात त्यांनी महत्मा फुले यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली, तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. चेतना हिरे यांनी केले.   

            या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माहाविद्याल्याचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर म्हणाले की, भारतीय समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड जातीवाद दूर करण्याचे काम महात्मा फुलेंनी केले, व्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि बुद्धीप्रामाण्य यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात ते आयुष्यभर लढले. केशवपन, बालविवाह, सतीप्रथा अशा अनिष्ठ प्रथांच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढा दिला. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नसून आणि वर्णव्यवस्था व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे. असे रोखठोकपणे महात्मा फुले यांनी ठामपणे सांगून जातीभेदच्या अंतसाठी आयुष्याच्या शेवट पर्यंत ते लढले. असे प्रतिपादन यावेळी केले.

          या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. निलेश देवरे, प्रा. कामेश गायकवाड, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. सविता पवार, अमोल शिंदे, किरण बच्छाव, गिरीश पवार, राहुल अहिरे, चेतन पवार, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.