KVN Naik सिन्नर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर महाविद्यालयात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक समाधान गायकवाड हे देखील उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक समाधान गायकवाड व नामदेव काकड यांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी असून शिक्षणाचे महत्व त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरातील लोकशाही व समाज व्यवस्थेचा अभ्यास करून भारताचे संविधान निर्माण केले. ते सर्व घटकांचा विचार करून निर्माण केलेले आहे असे मत समाधान गायकवाड यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. मंगल सांगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, हिंदू कोड बिल, त्यांनी समाजाला दिलेली जीवनमूल्ये यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमोल आव्हाड यांनी केले तर आभार प्रा. सागर सानप यांनी व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.