नेहा निलेश केदारे (कटारे) यांना माता रमाबाई आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नेहा निलेश  केदारे (कटारे) यांना माता रमाबाई आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नेहा निलेश  केदारे (कटारे) यांना उडान आंतरराष्ट्रीय अनुसूचित जाती व  अनुसूचित जमाती संशोध आणि विकास संघटनेमार्फत  "माता रमाबाई आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार-२०२५" प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना ८ मार्च २०२५, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रदान करण्यात आला. या भव्य कार्यक्रमास भारत सरकारचे कायदा व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, आनंदराज आंबेडकर, दूरसंचार  व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन  , संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ, लोकसभा पॅनल स्पीकर संध्या  राय, तसेच अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते. पुरस्कार वितरण उडान चे अध्यक्ष, माजी खासदार किरीट प्रेमजीभाई सोळंकी, नॅशनल प्रेसिडेंट अंजु बाला आणि जनरल सेक्रेटरी सुशील कुमार कलम यांच्या हस्ते करण्यात आले. नेहा केदारे (कटारे) यांना महाराष्ट्र पॅरामेडिक्स  आणि नर्सिंग क्षेत्रातील समाजसेवेसाठी दिलेल्या भरीव  योगदानासाठी हा  सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.