लोकशाहीच्या मजबुतीसाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे - प्रा. अंबादास पाचंगे
रावळगाव : कोणत्याही प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्रामध्ये निष्पक्ष व न्याय नियमितपणे निवडणुका होणे गरजेचे असते. भारतीय संविधान कर्त्यांनी भारतात निष्पक्ष व न्याय नियमितपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी अनेक संविधानिक तरतुदी भारतीय संविधानात केल्या असून, भारतातील सर्व नागरिकांना कोणत्याही पद्धतीचा भेदभाव न करता समान पद्धतीने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे भारतातील लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी व तिच्या मजबुतीकरणासाठी सर्वांनी निष्पक्षपणे आपल्या सद्सद विवेकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करून, आपल्या गाव परिसरातील नागरिकांना मतदान मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याचे आवाहन प्रा. अंबादास पाचंगे यांनी यावेळी केले.
श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदान विषयक जनजागृतीचे पोस्टर प्रदर्शन करून मतदार जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन, श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अंबादास पाचंगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत निकम यांनी, प्रास्ताविक प्रियंका पाटील या विद्यार्थिनीने केले, तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाल रोहिणी या विद्यार्थिनीने केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माहाविद्याल्याचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर म्हणाले की, भारतीय लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. हा लोकशाहीचा डोलारा असाच भक्कम ठेवण्यासाठी सर्वांनी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा या सर्वांच्या पुढे जावून, संकुचित विचाराला दूर ठेवत भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी निष्पक्षपणे मतदान करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील भावेश सोनवणे, लक्ष्मण रक्षे, योगेश ठाकरे, धनराज गायकवाड, प्रकाश सोनवणे, सागर सोनवणे, ऋषिकेश सोनवणे, संदेश कान्नोर, कुणाल शेलार, ऋषिकेश जाधव, किरण पगारे, शुभांगी हिरे, हर्षली पवार, ऋतुजा सोनवणे, अश्विनी सोनवणे, शीतल मगर, नयना करनर, सायली अहिरे, सपना सोनजे, पूजा निकम, या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे पोस्टर तयार करून मतदान जनजागृती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.