राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
लोणवाडी येथील क.का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचे प्रतिपदान
पिंपळगाव बसवंत :- ३०.०१.२०२४
माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी या उक्तीप्रमाणे स्वतःला सिद्ध करण्याची संधी रासेयो शिबिरातून उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत असते. यामध्ये नेतृत्व, वक्तृत्व, सभाधिटपणा, क्रीडा, संगीत, ग्रामीण जीवनाचा परिचय, लोकांची मानसिकता, समूहामध्ये कसे राहायचे या सर्व गोष्टीतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी कष्ट आणि जिद्द या बळावर कोणत्याही क्षेत्रात त्याला प्रगती करता येते. म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शिबिराच्या माध्यमातून साधला जातो, असे प्रतिपदान मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर लोणवाडी येथील समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, लोणवाडी गावाचे सरपंच श्रीमती पल्लवीताई साळवे, उपसरपंच सुनील चोपडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे व ग्रामस्थ बाळासाहेब दौंड, शिवाजी चोपडे, मल्हारी उफाडे, श्रीकांत जाधव, नरेंद्र गरुड, बळवंत जाधव, सुधाकर दौंड, अमोल साळवे, नामदेव गायकवाड, सदाशिव दौंड, भिकाजी साळवे, दत्तात्रय आहेर, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप दौंड, संजय जाधव, सुरेश शिंदे, शिवाजी कडलग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संपत खैरनार, प्रा. डॉ.दत्तात्रय फलके, प्रा.अजित देशमुख, मविप्र संस्थेचे, व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे म्हणाले की, महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यानाचा चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो. विद्यार्थ्यांच्या सहभागातून समाजउपयोगी हिताची कामे साधली जातात. विद्यार्थ्यांनांही गाव खेड्याच्या प्रश्नाची जाण होते. अशा शिबिरातून विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक दृष्टीने विकास होतो असे विचार त्यांनी मांडले.
मनोगत व्यक्त करताना स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे म्हणाले, श्रमदानाबरोबर प्रबोधन मिळवून देणारा हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमातून ज्ञानाची संस्काराची शिदोरी तुम्हाला मिळालेली आहे ती आयुष्यभर पुरत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी आशा उपक्रमामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
सरपंच पल्लवीताई साळवे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, महाविद्यालयीन स्तरावरील या उपक्रमातून गाव विकासाची कामे यातून साध्य होतात. गावातील ग्रामस्थांना विविध माहिती यातून मिळते. अशा स्वरूपाच्या उपक्रमातून गावात हितकारी कामे होतात असे विचार व्यक्त केले.
मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले, रासेयो या शिबिरातून गावखेड्यात उत्तम काम करण्याचे ध्येय घेऊन स्वयंसेवक काम करत असतात. यातून आपल्या गावाला आदर्श गाव पुरस्कार प्राप्त करून देणारी कामे निश्चित होतात असे विचार मांडले.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कु. वेदांत होळकर, प्रियांका गवळी या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. संपत खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अजित देशमुख यांनी केले तर अहवाल वाचन व आभार डॉ. दत्तात्रय फलके यांनी मानले. यावेळी हरिभाऊ पवार, प्रदीप गांगुर्डे, लभडे या सेवकांचे हिवाळी शिबिरात विशेष सहकार्य लाभले. यावेळी ग्रामस्थ व संस्थेचे हितचिंतक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ –
१) लोणवाडी येथील क.का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी बोलताना मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, यावेळी व्यासपीठावर मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, लोणवाडी गावाच्रे सरपंच श्रीमती पल्लवीताई साळवे, उपसरपंच सुनील चोपडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे व ग्रामस्थ बाळासाहेब दौंड, शिवाजी चोपडे, मल्हारी उफाडे, श्रीकांत जाधव, नरेंद्र गरुड, बळवंत जाधव, सुधाकर दौंड, अमोल साळवे, नामदेव गायकवाड, सदाशिव दौंड, भिकाजी साळवे, दत्तात्रय आहेर, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप दौंड, संजय जाधव, सुरेश शिंदे, शिवाजी कडलग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, प्रा. डॉ.दत्तात्रय फलके, प्रा.अजित देशमुख, मविप्र संस्थेचे, व ग्रामस्थ आदी.
२) लोणवाडी येथील क.का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी बोलताना मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, यावेळी व्यासपीठावर मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, लोणवाडी गावाच्रे सरपंच श्रीमती पल्लवीताई साळवे, उपसरपंच सुनील चोपडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे व ग्रामस्थ बाळासाहेब दौंड, शिवाजी चोपडे, मल्हारी उफाडे, श्रीकांत जाधव, नरेंद्र गरुड, बळवंत जाधव, सुधाकर दौंड, अमोल साळवे, नामदेव गायकवाड, सदाशिव दौंड, भिकाजी साळवे, दत्तात्रय आहेर, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप दौंड, संजय जाधव, सुरेश शिंदे, शिवाजी कडलग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, प्रा. डॉ.दत्तात्रय फलके, प्रा.अजित देशमुख, मविप्र संस्थेचे हितचिंतक व ग्रामस्थ आदी.