पिंपळगाव बसवंत, दि. १४/०४/२०२५
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथे क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "भीम-जयंती" मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 14 एप्रिल भारतरत्न डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती-दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व रासेयो स्वयंसेवकांनी हा उपक्रम हा उपक्रम हाती घेतला. सकाळी महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी निफाड फाटा येथे वसलेले भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्याजवळील सर्व परिसर ईत्यादी जागांची स्वच्छता व साफसफाई केली. प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोठ्या आवाजात संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींमधे थोर पुरूषांच्याबद्दलचे प्रेम, आदरभाव, त्यांच्या कार्याची महती समजावी तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, पर्यावरण जागरूकता, सामाजिक बांधिलकी, सृजनशिलता, आपुलकी, स्नेहभाव, सेवाभाव, नीटनेटकेपणा, स्वच्छता, साफसफाई ईत्यादींबद्दलचे कौशल्य निर्माण होऊन वाढीस लागावे, याकरिता अशाप्रकारचे उपक्रम आम्ही नेहमीच राबवतो, असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप माळोदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित आॕनलाईन स्वरूपात "प्रश्नमंजुषा" घेण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. ज्ञानोबा ढगे यांनी केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आयोजनाची भूमिका मांडली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. अमोल मेहेंदळे, कनिष्ठ विभागाचे प्रा. कैलास घुमरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. निशांत वडघुले, प्रा. उषा कदम, प्रा. गवळी प्रा निर्मला जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी सेवक श्री. हरी पवार, श्री. चंद्रकांत ठाकरे, श्री. दिपक बनकर, श्री. बाजीराव गडाख, श्री. शिवप्रसाद गवळी, श्री. कार्तिक मोरे, श्री. राजू मोरे, इत्यादी अनेकजण उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. उषा कदम यांनी केले तर आभार प्रा. निशांत वडघुले यांनी मांनले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नॕक समन्वयक डाॕ. नरेंद्र पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. भगवान कडलग, प्रा. मोहन कांबळे, प्रा. नामदेव गावित, प्रा. निलेश आहेर, प्रा. अजित देशमुख, प्रा.डाॕ. छाया भोज, प्रा. चेतन गागरेपाटील, प्रा. तुषार मोरे, प्रा. हेमंत पाटील इत्यादींनी मेहनत घेतली.