वाणिज्य शाखेत करिअरच्या अनेक संधी
क.का.वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथे आयोजित वाणिज्य मंडळाचे उद्घटनप्रसंगी प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपळगाव बसवंत ६.३.२०२४
मानवी इतिहासा इतकाच वाणिज्य व्यवहार जुना आहे. सध्याचे युग हे औद्योगिक प्रगतीचे, आधुनिक तंत्रज्ञानचे आहे. जागतिक बाजारेठेमुळे वाणिज्य शाखेमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतील विविध कोर्सेस प्राप्त केली तर त्यांच्या कर्तुत्वाला वाव आहे. कष्टाने काम केल्यास यश हमखास मिळते. शासकीय, निमशासकीय, सहकार क्षेत्र, खाजगी कंपन्या, सेवा क्षेत्र आदी क्षेत्रात देश आणि विदेशात विविध पद भरताना वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा आग्रक्रमाने विचार केला जातो असे, प्रतिपादन निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथे आयोजित वाणिज्य मंडळ उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आशा कदम, प्रा. निशांत वडघुले, प्रा. सविता कदम, प्रा. विनय कदम आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे पुढे म्हणाले, वाणिज्य विभागातील विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करून विद्यार्थी स्टार्टअप करू शकतात. छोटे-मोठे उद्योग उभारू शकतो. एखाद्या उद्योग क्षेत्रात उत्तम संशोधन करून स्वतःचे पेटंट मिळवू शकतात, अशा विविधांगी बाबींचा उल्लेख करत आजपर्यंत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उदाहरणे देत वाणिज्य शाखेचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्षीय मनोगतात व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले आवड जोपासत वाणिज्य शाखेकडे पाहिले पाहिजे. जिद्द चिकाटी, परिश्रमाचा जोरावर आपण आपला छोटा - मोठा व्यवसाय, उद्योग, मार्केटिंग अशासारखे पर्याय आपला उपलब्ध आहे असे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख श्रीमती डॉ. आशा कदम यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता कदम यांनी केले तर आभार प्रा. विनय कदम यांनी मानले. यावेळी प्रा. मंजुषा भंडारे, प्रा. सागर संधान तसेच वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.