महाराष्ट्र चेंबर आणि युरोप इंडिया कॉमर्स यांच्यामध्ये सामंजस्य करार

महाराष्ट्र चेंबर आणि युरोप इंडिया कॉमर्स यांच्यामध्ये सामंजस्य करार
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर व यूरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यामध्ये महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाला चालना देणे, जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तंत्रज्ञान व माहितीची देवाण-घेवाण करणे यासाठी शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ रोजी चेंबरच्या मुख्यालयात सामंजस्य करार करण्यात आला.  याप्रसंगी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती देऊन स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्र चेंबरने राज्यातील व्यापार उद्योगाला जागतिक स्तरावर बाजारपेठ व जागतिक स्तरावरील व्यापार उद्योगांना राज्यातील व्यापार उद्योगात सहभागी करून घेण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच विविध देशातील चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर झालेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली.  युरोप इंडिया कॉमर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील व्यापार उद्योगाला निश्चितच चालना मिळेल. राज्यातील व्यापार उद्योगाला जागतिक बाजारपेठेतील संधी मिळतील असा विश्वास व्यक्त केला.  
सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी युरोप इंडिया कॉमर्सचे अध्यक्ष अमित लाट व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी यूरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष  अमित लाट यांनी महाराष्ट्र चेंबर कार्याची माहिती घेऊन चेंबरच्या कार्याचे कौतूक केले. दोन्ही चेंबरच्या माध्यमातून व्यापार-उद्योगांचा विकास करणे, बाजारपेठ उपलबद्ध करून देणे, नेटवर्किंग करणे यासह विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यांचा फायदा व्यापार उद्योगाला निश्चित होईल असे सांगितले. 
या करारादरम्यान यूरोप इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष  अमित लाट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री  अँण्ड अग्रिकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शमिका नाडकर्णी, कैलास चांडक, प्रतीक सोनावणे हे उपस्थित होते.