दापुरे, त्र्यंबकेश्वर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
8 मार्च 2024 रोजी दापुरे , त्रंबकेश्वर येथे उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. दिव्य फाउंडेशन व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी व्हावे व त्यांच्यातील उद्योजकता वाढीस लागावी याकरिता उद्योजकीय प्रशिक्षक सौ. लीला सोनवणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले . उपलब्ध उद्योग संधी व महिलांना शक्य असलेले व्यवसाय यावर त्या बोलल्या . तसेच त्यांना उद्योजकीय कौशल्य वाढवणे कसे गरजेचे आहे आणि मार्केटिंग कसे करावे या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला. अनेक महिला खेडोपाडी छोटे छोटे व्यवसाय शिकत आहे व करत आहे असेही लक्षात आले. महिला दिनानिमित्त त्रिशरण फाउंडेशन च्या वतीने किशोरवयीन मुली व महिलांना हेल्थकेअर किट व सॅनेटरी पॅड वाटण्यात आले व मासिक पाळीच्या वेळी आरोग्य कसे जपावे यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले. दिव्य फाउंडेशन दापुरे गाव , पाटील वाडी अशा काही गावांमध्ये सतत असे सामाजिक उपक्रम राबवून तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरता श्री सुयोग कुलकर्णी श्री चंद्रशेखर बोराडे व स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या सौ रीना पाटील तसेच के के वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक यांनी विशेष सहकार्य केले . गावातील शाळेतील शिक्षक श्री दाभाडे यांनी विषेश योगदान दिले. यावेळी सरपंच व गावकऱ्यांनी सर्वांचे आभार मानले.