नेहरूनगर वसाहत ते सीएनपी फर्स्ट व सेकंड गेट रस्त्याचे नूतनीकरण कार्य प्रारंभ

नेहरूनगर वसाहत ते सीएनपी फर्स्ट व सेकंड गेट रस्त्याचे नूतनीकरण कार्य प्रारंभ

नेहरूनगर वसाहत ते सीएनपी फर्स्ट आणि सेकंड गेट या रस्त्याची दुरावस्था खूप वर्षांपासून झाली होती. या संदर्भात युनियन आणि वर्क्स कमिटीच्या माध्यमातून मॅनेजमेंटशी वारंवार चर्चा करण्यात आली आणि अखेर या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघाला.

दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम औपचारिकरित्या सुरु करण्यात आले. या प्रसंगी सौरभ कुमार सर (ISP), कुलकर्णी सर, कासविकर सर, तसेच मजदूर संघाचे जॉइंट सेक्रेटरी नंदूभाऊ कदम, संतोष कटाळे, वर्क्स कमिटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब ढेरिंगे, सेक्रेटरी सुभाष ढोकणे, वेल्फेअर फंड कमिटीचे JS अण्णा सोनवणे, मा. व्हाईस चेअरमन योगेश कुलवधे, सतीश चंद्र मोरे, कचरू ताजनपुरे, गणेश काळे, राजेंद्र काजळे यांनी नारळ वाढवून रस्त्याच्या दुरुस्ती कामास प्रारंभ केला.

या वेळी मजदूर संघाचे पदाधिकारी व सदस्य, वर्क्स कमिटी व वेल्फेअर फंड कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे संचालक, तसेच अनेक कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे कामगार वसाहतीतील रहदारी सुलभ होणार असून, रस्त्याच्या दुरुस्तीमुळे परिसरात एक सकारात्मक बदल घडून येणार आहे.