कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे कॉम्पुटर सॉफ्ट स्किल कोर्स संपन्न

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे कॉम्पुटर सॉफ्ट स्किल कोर्स संपन्न

            रावळगाव प्रतिनिधी : वर्तमान युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात असून, आज जगात प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकीय प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, भारतात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे ॲप वापरे जातात, हे ॲप वापरत असतान प्रत्येकाकडून नकळतपणे त्या ॲपला आपली मोठ्या प्रमाणात वयक्तिक माहिती दिली जाते. संगणक प्रणाली ही एखाद्या चाकुसारखी असून, त्याचा प्रत्येकाच्या घरातील चांगल्या कामासाठी वापर होते, तसेच त्याच चाकूने एखाद्याचा खून सुद्धा केला जाऊ शकतो, त्यामुळे हे ॲप वापरत असताना प्रत्येकानेच जागरूक राहणे व काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रा. अनुप्रिता शिंदे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख मसगा महाविद्यालय मालेगाव कॅम्प यांनी यावेळी बोलताना केले.

            श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील राज्यशास्त्र विभाग व संगणकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान व्हावे या उद्देशाने दहा दिवसीय “कॅम्पुटर प्रमाणपत्र सॉफ्ट स्किल कोर्सचे” आयोजन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कॉम्पुटर कोर्सचा आज दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी समारोप करण्यात आले होते, महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज हे होते. तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून, अनुप्रिता शिंदे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख मसगा महाविद्यालय मालेगाव कॅम्प या उपस्थित होत्या, यावेळी त्यांनी सायबर सुरक्षा व सायबर जागरुकता या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कामेश गायकवाड यांनी केले, प्रास्ताविक प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले त्यात त्यांनी सदर कोर्सच्या आयोजनाचा उद्देश व महत्त्व सांगून कोर्स मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. निकिता पवार या विद्यार्थिनीने केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आकेश दुकळे यांनी केले.

           या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माहाविद्याल्याचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार सॉफ्ट स्किलला फार महत्त्व देण्यात आलेले असून, आजच्या काळातील प्रत्येक तरुणांनी सॉफ्ट स्किल आत्मसाद करणे गरजेचे असून, कुशल कौशल्य असणाऱ्याच तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. असे प्रतिपादन केले.

         या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. शरद आंबेकर  प्रा. निलेश देवरे, प्रा. मनीष ठोके, प्रा. राज ठाकरे, प्रा. प्रशांत निकम, प्रा. वर्षा पवार, प्रा.सौ.जी.एस.खैरनार, प्रा. मोहिनी निकम, प्रा. सोनम पाटील, प्रा. प्रियंका भामरे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. नेहा गांगुर्डे, प्रा. चेतना अहिरे, प्रा. पायल गायकवाड, सचिन भदाणे, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्ये उपस्थित होते.