रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ' जो तुमको हो पसंद ' सांगितिक मेजवानीत रसिक दंग
नाशिकरोड : " तेरी आखो के सिवा, वादा करले साजना, मार गयी मुझे तेरी जुदाई, तुम्हारी नजर क्यू खफा हो गई, ओ मेरे दिल के चैन, छलकाये जाम, लग जा गले, सुरमई अखियो मे, मी डोलकर डोलकर, ये आखे देखकर हम, जिंदगी के सफरमे, जो तुमको हो पसंद, ना कजरेकी धार, आया सावन झुमके ," अशी एक से गाणी कलाकारांनी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले .

निमित्त होते नाशिक इंदिरानगर येथील रायझिंग सिंगर्स कराओके ग्रुप प्रस्तुत
रुपेश शिंपी आयोजित ' जो तुमको हो पसंद ' या
सदाबहार सुमधुर मराठी, हिंदी गीतांची संगितमय कार्यक्रम इंदिरानगर येथील स्वर्णिमा हॉल येथे बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या व रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात सम्पन्न झाला . या संगीतमय मैफिलीत रायझिंग सिंगर्स ग्रुपचे कलाकार यांनी विविध गाणी सादर केली . यात स्वतः रुपेश शिंपी यासह विनोद साखरे, प्रकाश महाले, संजय परमसागर, अँथोनी सरदार, सतीश पंचभाई, हेमंत अहिरराव, गोविंद मेटकर, अनिल खैरनार उमेश पगारे , दिपाली मिस्त्री, रूपाली नागरे, नूतन मिस्त्री, वसुधा पगारे , जयश्री माळी, चंचला सुरते या गायकांनी एक से एक विविध गीते सादर केली. या गाण्यांचा आनंद घेत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त दाद दिली .

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. रायझिंग सिंगर्स ग्रुप वतीने हा सातवा कार्यक्रम आयोजित होत असून विविध सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात यात ' वृक्ष लावा वृक्ष जगवा, कापडी पिशव्या वाटप तसेच वृद्धाश्रमास, गरीब होतकरू विद्यार्थ्यास व दिव्यांग बंधूस तसेच आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम ग्रुप तर्फे राबवले जात असल्याची माहिती संयोजक रुपेश शिंपी यांनी दिली. या कार्यक्रमात श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाशिक वतीने मोफत हृदयरोग मधुमेह रक्तदाब तपासणी व आरोग्य शिबिर होत असून विविध तपासण्या आवश्यकतेनुसार सवलत दराने करण्यात येतील. या कार्यक्रम व उपक्रमांसाठी नितीन जगदाळे व सौ. माधुरी शिंपी यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री. पवन रोकडे यांनी ध्वनीसंयोजन केले .

digitalnashik_admin




