गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मनपाची आढावा बैठक पार

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात "दरजेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण" या विषयावर आज राजीव गांधी भवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि आमदार किशोर दराडे उपस्थित होते.
बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर,शहर अभियंता संजय अग्रवाल, शिक्षण अधिकारी डॉ. मीता चौधरी, शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शालेय पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण उपक्रम, आणि गुणवत्तापर शिक्षणासाठी आवश्यक बाबींवर चर्चा झाली. आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत दिशा ठरवण्यात आली.