तरुप्रीत प्रकल्पांतर्गत मिरगाव येथील के. व्ही. एन. नाईक माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण!
तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने बीजारोपण व वृक्षारोपण करणाऱ्या डॉ. मंगल सांगळे व प्रा.प्रियांका केदार ह्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील के. व्ही. एन. नाईक माध्यमिक विद्यालय येथे ३० हून अधिक रोपांची लागवड केली. यावेळी आंबट चिंच, खिरणी, जांभूळ, मोह, सिसव, पेरू यांसारख्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सानप, धनंजय मुंढे, चेतन ठाकरे, संदीप रुकारी, प्रकाश भाबड, योगिता कहांडळ, राणी कडनोर आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरवळ पसरावी म्हणून तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मंगल सांगळे यांनी सांगितले.
वर्षभर तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यावरणपूरक काम केले जाते. 'रोपटे आमचे अंगण तुमचे' ह्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीजारोपण व वृक्षारोपण करूया, वसुंधरेचा हिरवेपणा जपुया हे ब्रीद असणाऱ्या तरुप्रीत प्रकल्पाची हिरवळ मोहीम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.


digitalnashik_admin




