' बॉलीवूड बिट्स लाईव्ह ऑर्केस्ट्रा ' हिंदी गीतांच्या कार्यक्रमात रसिक दंग...
नाशिकरोड : आत्मजा डायनामिक सिंगर्स आयोजित डॉ. नूतन मिस्त्री प्रस्तुत ' बॉलीवूड बिट्स लाईव्ह ऑर्केस्ट्रा ' या बहारदार हिंदी गीतांचा कार्यक्रम ( दि.६ जुन) रोजी सायंकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालिमार, नाशिक येथे आयोजित करण्यात आला. मिलिंद यशोद, ॲड फिल्म मेकर,प्रशांत जुन्नरे ,उषाताई पाटेकर गायिका,अनिल जगताप,उज्वला शिंदे,वर्षा कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या मैफिलीत एकूण २२ गायकांनी आपले गायन कौशल्य सादर करत एकसे एक हिंदी सोलो व डुएट गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली . यात नूतन मिस्त्री यासह संजय कथुरिया, शिवराज चौहान, उत्पला शिंदे, वर्षा कुलकर्णी, पूनम सारंगधर, रंजना महाजन, बीटी ठाकूर, पूजा पाटील, संजय परमसागर, गोविंद मेटकर, विश्वास कापडणे, सोनू करंदीकर, रुपाली नागरे, नितीन केदारे, अनिल खैरनार, मीता सुचक, सुजाता देव, स्वानंद पारखी, अनुपमा क्षीरसागर, शैलेश कुलकर्णी , सचिन, विनय चंद्रात्रे या गायक कलाकारांनी ' दिल जो ना केह सका, क्यू की तुम ही हो, इम्तिहा हो गयी, आजा आजा मै हु, तेरा साथ है कितना प्यारा, आजा श्याम होने आयी, सून बेलिया, तू शायर है, तेरे मेरे ओठोपे, ये जमीन गा रही है, आसमान से आया, जे हम तुम, छोड दो आचल जमाना क्या कहेगा, ये रात भीगी भीगी, आजकल तेरेमेरे प्यारके चर्चे, ये रेश्मी जुल्फे ' अशी एकसे एक गाणी गाऊन रसिक श्रोत्यांची मने खिळवून ठेवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पोतदर यांनी आपल्या विशेष उमजदार शैलीत केले तर संगीत संयोजन जयंत पाटेकर आणि ब्रदर्स यांनी केले . यावेळी उपस्थित भाग्यवंतास आकर्षक भेटवस्तु प्रदान करण्यात आली . कार्यक्रमास विश्वशांती हास्य योग समन्वय समितीच्या सौ. जयश्री गावित यांचे अनमोल सहकार्य लाभले. आयोजक सिने मेकअप आर्टिस्ट रोहित मिस्त्री यांनी सर्व उपस्थितांचे हार्दिक आभार मानले. मिलिंद यशोद, ॲड फिल्म मेकर,प्रशांत जुन्नरे ,उषाताई पाटेकर गायिका,अनिल जगताप,उज्वला शिंदे,वर्षा कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.




digitalnashik_admin




