' मेहेकी यादे : ' सांज पाडवा ' संगीत मैफिलीत रसिक श्रोते दंग.....

' मेहेकी यादे :  ' सांज पाडवा ' संगीत मैफिलीत रसिक श्रोते दंग.....

नाशिकरोड :       एस व्ही कराओके सिंगिंग क्लब, नाशिकरोड वतीने  आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे : सांज पाडवा ' या  संगीत मैफिलीत नाशिकरोडकर रसिक श्रोते यांनी गायकांनी गायलेल्या गीतांना भरभरून दाद दिली.. गुरुवार ( दि.१२ नोव्हेंबर ) सायंकाळी ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे रंगलेल्या दीपावली सांजपाडवा  मैफिलीत हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल संगम अनुभवायला  मिळाला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला रसिक स्रोते यांची उत्स्फूर्त गर्दी होत दाद मिळाली . मैफिलीची सुरुवात गणेश स्तवनाने गाऊन त्यानंतर विनोद बर्वे यांनी ' तू मेरी जिंदगी है ' गीताने प्रारंभ करत इतर गायकांनी " राजा ललकारी अशी घे, आली माझ्या घरी दिवाळी, देखा है पहली बार,  समा है सुहाना सुहाना, पन्ना की तमन्ना है के, जिये तो जिये कैसे, दुनिया मे लोगो को धोका कभी, हे चिंचेचे झाड, चेहरा क्या देखते हो, निगाहे मिलाने को जी चाहता है,  छुप गये सारे नजारे, एहेसान तेरा होगा मुजपर, अखेरचे येतील माझ्या," अशा विविध गीतांनी वातावरण भारावून टाकले. 

           या संगीत मैफिलीत गायक संजय परमसागर  यासह गॉडविन लुईस, दत्तात्रय पाटील, स्वप्ना गोखले, वैशाली राजपूत, प्रितम आमेसर, सुदेश आमेसर, स्मिता पोटे, डॉ.सुनयना भुजबळ , पद्मा देशपांडे, अनुपमा क्षीरसागर, परमेश्वर चिंतकिंदी, जितेंद्र दिवे, संतोष जोशी, राजेंद्र माळी, मिता सुचक, रोहित कुलकर्णी, शाम शहाणे, सुप्रिया बनसोड, सुरेंद्रनाथ सोनार, शैलजा सोनार, रवींद्र जांभळे यांनी आपल्या सुरेल आवाजत विविध गाणी सादर करीत रसिकांना  खिळवून ठेवले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यात गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, प्रा. निता कुलकर्णी,  अफलातून ग्रुपचे अनिलभाऊ पोटे, , गायक उदय महादास, डॉ. माधुरी जाधव, नितीन गायकवाड,, ऍड. विनायक मेदगे, शंकर ताठे, मोहनभाऊ पवार, अतुल गांगुर्डे, किशोर वडनेरे, निवेदकं अशरफ, रवींद्र रणसिंग, संदीप सावंत यासह रसिक उपस्थित होते.  ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे यांनी तर सूत्रसंचालन वैशाली राजपूत यांनी काव्यशैलीत  खुमासदारपणे  करत  उपस्थित  श्रोत्यांना खिळवून ठेवले.