एसएसके. कला व वाणिज्य महाविद्यालय नायगांव येथे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात!
धनलक्ष्मी शिक्षण संस्था संचलित एस. एस. के. कला व वाणिज्य महाविद्यालय नायगांव येथे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. उज्ज्वला कातकाडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. खैरनार यांनी केले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेची वाटचाल तसेच पदवी नंतर पदव्युत्तर टप्प्यापर्यंतचा प्रवास यावेळी डॉ. के. टी. खैरनार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडला. कार्यशाळेकरिता मार्गदर्शक म्हणून लोकनेते व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक येथील संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ आरती लोखंडे उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच त्यांनी परीक्षा पद्धत, त्यातील बारकावे यांसारख्या अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. संस्थेचे सरचिटणीस व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कुणाल कातकाडे यांनी देखील विद्यार्थ्यांशी कार्यशाळेच्या अनुषंगाने संवाद साधला. जिद्द व चिकाटी या जोरावर आपण आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहचावे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक महत्वपूर्ण बाबी सांगितल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद पानसरे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गोरख वाघले, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शुभम जाधव, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सतीश कापडी, प्रा. सुरेश थोरात, बहिशाल विभागाच्या प्रा.शुभांगी आव्हाड, प्रा. डॉ. ज्योती गायकवाड प्रा. योगेश चौधरी प्रा. सोनाली खुर्चे, प्रा. वैशाली रिपोटे, प्रा. नर्गिस अन्सारी, तसेच विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मंगल सांगळे यांनी केले.

digitalnashik_admin




