सुर विश्वास स्वरांतून आर्ततेने निथळली ईश्वरभक्ती

सुर विश्वास स्वरांतून आर्ततेने निथळली ईश्वरभक्ती

(.नाशिक )स्वरांचे माधुर्य , नजाकत व उपजत अभिजात स्वर यांचे गोंदण घेऊन सुर विश्वास ची मैफल छान रंगली. यातून 

ईश्वर भक्तीची आस उपस्थितांनी अनुभवली.  नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात येते . त्यात मुग्धा पेंढरकर किंकर.यांचे गायन संपन्न झाले  अंशुल किंकर (तबला), शुभांगी भावसार(संवादिनी) सोहा ठकार .(तानपुरा )यांची त्यांना साथसंगत लाभली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.

मैफिलीचे हे अठ्ठेचाळीस वे पुष्प होते विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. विश्वास हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

नाद,शब्द,सुर यातील मूलभूत जाणीव जोपासणारे मुग्धा पेंढरकर यांचे गायन प्रयोगशील ,तरल होते. मुग्धा यांनी यांनी मैफिलीची सुरुवात' राग भूपाल तोडी' ने केली,बडा ख्याल पारंपरिक बंदिश होती शब्द होते. मांगण मांगत आयो 

त्यानंतर छोटा ख्याल सादर केला 

भनक परी कान .बंदिशितील शब्द, व स्वरसाज घेऊन शास्त्रीय गायनाच्या अनोख्या अनुभूतीचा प्रत्यय होता. आस आणि मनाचे रिक्तपण यातून सहजपणे व्यक्त झाले.त्यानंतर कुकुभ बिलावल रागातील झपताल,तीनताल, आणि पारंपरिक.बंदिश सादर केली शब्द स्वरांची कोवळीक घेऊन आले.त्यानंतर ईश्वरभक्ती , प्रेम यांची व्यापक जाणीव करून देणाऱ्या रचना सादर झाल्या ,चैती,तील संत गोरा कुंभार यांचा अभंग सादर केला.मैफिलीचा समारोप सहजोभाई यांच्या अष्टपदीने झाला.

  अध्यात्माची अनुभूती देणारी  अष्टपदी होती 

यावेळी सुरविश्वास चे कलाकार पं.डॉ अविराज तायडे,अमृता जाधव जोशी , कल्याणी दसक कर तत्ववादी यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला

ज्योती कुलकर्णी , आर के देवधर,पद्मजा कोतवाल,प्रशांत चिटणीस , डॉ मनोज शिंपी ,विनायक रानडे,यांचे हस्ते सन्मान करण्यात आले.

सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, विश्वास ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन,  रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले.