नगरसेवक कैलास (अण्णा) मुदलियार यांची तत्परता-नाशिक रोड येथे ड्रेनेजची समस्या तातडीने मार्गी

नगरसेवक कैलास  (अण्णा) मुदलियार यांची तत्परता-नाशिक रोड येथे ड्रेनेजची समस्या तातडीने मार्गी

नाशिक रोड परिसरातील दुर्गेश, मॅग्नम हॉस्पिटल शेजारी असलेल्या एका इमारतीबाहेर निर्माण झालेली ड्रेनेजची समस्या महानगरपालिका नगरसेवक श्री. कैलास   (अण्णा) मुदलियार यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत सोडवण्यात आली.

नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ५ मिनिटांत नगरसेवकांनी स्वतः संपर्क साधत तातडीने दखल घेतली. पुढील ५ तास अविरत काम करून ड्रेनेज दुरुस्ती पूर्ण करण्यात आली, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक असलेले कैलाश (अण्णा) मुदलियार हे युवक उपक्रम, सामुदायिक विकास, शिक्षण व आरोग्य सहाय्य तसेच सामाजिक-आध्यात्मिक कार्यात सक्रिय असून, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत नेहमीच तत्पर असतात.