स्वररंग इव्हेंट प्रस्तुत ' सरप्रायजिंग सोलो ' सांगितिक मेजवानीत आजी, आजोबा दंग .....

स्वररंग इव्हेंट  प्रस्तुत ' सरप्रायजिंग सोलो '  सांगितिक मेजवानीत आजी, आजोबा दंग .....
स्वररंग इव्हेंट  प्रस्तुत ' सरप्रायजिंग सोलो '  सांगितिक मेजवानीत आजी, आजोबा दंग .....

नाशिकरोड :  " मुसाफिर हू यारो, जीवन के दिन छोटे सही, तुझा कृष्ण मुरारी, माझ्या मनी प्रियाची, तुझे सुरज कहू या चंदा, माना हो तुम बेहद हसी, अजी ऐसा मोका फिर कहा मिलेगा, जैसी करनी वैसी भरनी, चांद सी मेहबूबा, हे चिंचेचे झाड, फिरी फिरी नाच, हिम्मत  ना  हार चल चला चल , सवेरे वाली गाडी से चले जायेंगे, ह्यो ह्यो पावना सखूचा मेव्हना ," अशी एक से गाणी कलाकारांनी सादर करीत आबाल वृद्धांना मंत्रमुग्ध केले .

          निमित्त होते हिरावाडी रोडवरील वात्सल्य आनंदाश्रम येथे स्वररंग इव्हेंट  प्रस्तुत शैलेश सोनार आयोजित ' सरप्रायजिंग सोलो ' कार्यक्रमात सुमधुर मराठी, हिंदी गीतांची सांगितिक मैफिल  मान्यवरांच्या तसेच निराधार व दिव्यांग वृद्ध आजी आजोबांच्या उपस्थितीत उत्साहात सम्पन्न झाली . यात स्वतः शैलेश सोनार यासह  अतिथी गायिका मयुरी मुरुडेश्वर, गायक जितेंद्र दिवे , संजय कथुरिया, संजय परमसागर,  सदाशिव इंगळे,अँथोनी सरदार, पूनम सारंगधर, श्वेता डोके, विजय राठोड, संतोष सूर्यवंशी, विनोद साखरे,दीपक सूर्यवंशी, कैलास कपाटे, सतीश पंचभाई, सतीश अहिरराव, विलास अहिरे, योगिता गोसावी, वैशाली राजपूत,अस्मिता कुलकर्णी, दीपक सूर्यवंशी, सचिन पवार , शिवराज चव्हाण,या गायकांनी  एक से एक विविध गीते सादर केली. या गाण्यांचा आनंद  घेत वृद्ध आजी आजोबा यांनी  उस्फुर्त दाद देत गाण्यांवर नाचत ठेका धरला.

          सर्व कलाकारांचे वात्सल्य वृद्धाश्रमाचे संचालक  व संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार व सौ. पायल सोनार यांनी स्वागत केले. स्वर रंग इव्हेंट वतीने दर महिन्याला वृद्धाश्रमास भेट देऊन विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सौ. रोहिणी सोनार यांनी खुमासदार काव्यशैलीत  सूत्रसंचालन करून वृद्ध आजी-आजोबांची वाहवा मिळवत खीळवून ठेवले . श्री. सुरेश काफरे यांनी सुरेल ध्वनीसंयोजन केले.