तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार डॉ. कृष्णा शहाणे यांना प्रदान
डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर, जळगाव यांच्या वतीने दिला जाणारा तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर डॉ. शिवचरण उज्जैनकर, डॉ. रमाकांत जाधव, डॉ. राजेंद्र शहाणे, सार्थक शहाणे आदी उपस्थित होते.
डॉ. कृष्णा शहाणे हे बिटको महाविद्यालय नाशिकरोड येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत असून आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत. डॉ. शहाणे यांनी त्यांचे बंधू डॉ. राजेंद्र शहाणे यांचे समवेत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचे साठी १५ आणि इतर प्रकाशना साठी ६ अशी अर्थशास्त्रावरील एकूण २१ क्रमिक पुस्तके प्रकाशित केलेली असून. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून अर्थशास्त्र विषयावरील विविध संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुलुंड मुंबई, खालसा कॉलेज, मुंबई, केळकर कॉलेज मुंबई यांच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. अर्थशास्त्र या विषयावर आकाशवाणी केंद्र नाशिक येथून त्यांची अनेक प्रख्याने प्रसारित झालेली आहेत. याशिवाय ते कांदा प्रश्नाचे जाणकार असून या विषयावर ते पीएचडी प्राप्त आहेत.
याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी, अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक ब्रांच सेक्रेटरी डॉ. प्रणव रत्नपारखी, कुलसचिव गिरीश नातू, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कापसे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

digitalnashik_admin




