नाशिक जिल्हा विकासाच्या कामकाजात आता अधिक सुसूत्रता येणार- निमा अध्यक्ष आशिष नहार

नाशिक जिल्हा विकासाच्या कामकाजात आता अधिक सुसूत्रता येणार- निमा अध्यक्ष आशिष नहार

नाशिक - नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या नूतन अध्यक्षपदी आशिष नहार यांची निवड झाल्यानंतर संस्थेने आपल्या कार्यप्रवृत्तीत नवा उत्साह आणि गती आणली आहे. अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्थेच्या कामकाजाला अधिक प्रभावी  बनवण्यासाठी विविध समित्यांची स्थापना केली आहे.

निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी या समित्यांद्वारे नाशिकमधील औद्योगिक प्रगतीला नवी दिशा देण्याची योजना तयार केली आहे. या समित्यांच्या सक्रिय कामकाजामुळे नाशिकमधील विविध विकासकामांना गती मिळणार आहे, आणि शहरातील औद्योगिक क्षेत्राचा विकास  होईल.

नवीन समित्यांच्या माध्यमातून नाशिकमधील व्यवसाय, प्रकल्प आणि औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल, असे  नहार यांनी सांगितले.

निमाने जाहीर केलेल्या समित्या आणि त्यांचे प्रमुख पुढीलप्रमाणे.

1 निमा हाऊस - किरण जैन 

2 इन्फ्रास्ट्रक्चर - सचिन कंकरेज 

3 लीगल - नितीन वागसकर

4 निमा पॉवर - मिलिंद राजपूत 

5 स्किल अँड स्टार्टअप - श्रीकांत पाटील 

6 निमा बुलेटीन - संजय राठी 

7 सेमिनार - व्हीनस वाणी 

8 ग्रेवियांस - कैलास पाटील

9 फायनान्स - विरल ठक्कर / सना खान 

10 सीएसआर फंड रायझिंग - वि चंद्रशेखरन 

11  निमा ऍप - नितीन आव्हाड 

12 कॉन्स्टिट्यूशन - विवेक गोगटे 

13 एक्सलेन्स अवॉर्ड - राजेंद्र कोठावदे 

14 बीटूबी /TQM - मितेश पाटील 

15 फूड प्रोसेसिंग - वैभव नागसेठीया 

16 सिक युनिट रिवायवल - सुयश छाजेड 

17 आयआर एचआर - हेमंत राख 

18 एक्सपोर्ट इंपोर्ट - हर्षद ब्राह्मणकर 

19 इंटरनॅशनल बिझनेस - सी.एस.सिंग 

20 आयटी - अरविंद महापात्रा 

21 कल्चरल अँड फंड रायसिंग - सतीश कोठारी 

22 वुमन एम्पॉवरमेंट - सौ. ब्रिंदा रावल  / सौ. शेफाली शर्मा 

23 पास्ट प्रेसिडेंट कॉर्डिनेशन - मनीष कोठारी 

24 पॉलिसी ऍडवोसी - संजीव पैठणकर 

25 सोलर अँड ईवि - प्रशांत जोशी

26 रिसेप्शन -  भावेश माणेक 

27 एम्प्लॉयमेंट जनरेशन - गोविंद बोरसे 

28 अदर असोसिएशन कॉर्डिनेशन - निखिल पांचाळ 

29 लार्ज स्केल इंडस्ट्रीज कॉर्डिनेशन -किरण पाटील 

30 एमएसएमइ - सौ. दिपाली चांडक 

31 इंडस्ट्रियल सेफ्टी - समीर पटवा 

32 नाशिक ब्रॅंडिंग - एन टी गाजरे 

33 सिन्नर पॉवर - प्रवीण वाबळे 

34 सिन्नर इन्फ्रास्ट्रक्चर - सुधीर बडगुजर 

35 सिन्नर डेव्हलपमेंट - किरण वाजे 

36 सिन्नर निमा रिक्रेशन - एस. के. नायर 

37 सिन्नर ग्रेविएन्स - विश्वजीत निकम 

38 सिन्नर निमा हाऊस - रविंद्र पुंडे 

39 सिन्नर फंड रायसिंग - तानाजी वारुंगसे 

40 दिंडोरी डेव्हलपमेंट - योगेश पाटील

41 दिंडोरी इन्फ्रास्ट्रक्चर - ललित सुराणा 

42 तसेच नव्याने स्थापन करण्यात आलेले  - ॲडव्हायझरी बोर्ड - संतोष मंडलेचा हे नेतृत्व करतील.

निमाच्या पंचसूत्री अजेंडानुसार, नाशिकच्या औद्योगिक विकासास गती देण्यासाठी पाच महत्त्वाच्या समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

या समित्यांची कार्ये आणि पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत-

1. मेगा प्रोजेक्ट – अखिल राठी

2. ड्राय पोर्ट – राजाराम सांगळे आणि हरिप्रीत सिंग

3. एक्झिबिशन सेंटर – हेमंत खोंड

4. सीपीआरआय लॅब व रिन्यूएबल एनर्जी– कैलास आहेर

5. आय टी  हब – सुरेंद्र मिश्रा 

या सर्व सामिती चेअरमन यांना यांच्या समितीमध्ये पाच ते दहा सदस्य सामावून घेऊन त्यांची समिती कार्यरत करण्याचे यावेळेस श्री नहार यांनी सुचवले. आता सर्व समित्या अस्तित्वात आल्याने निमाच्या कार्याला अधिक गती मिळेल व आगामी काळात उद्योजकांच्या सर्व समस्या संबंधित समित्यांमार्फत सोडविण्यासाठी निमाचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील. 

समित्यांचे नियुक्त सर्व चेअरमन त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांची क्षमता व अनुभव पडताळूनच समित्यांचे वाटप केल्याचे निदर्शनास येत असल्याने उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.