महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या जैन नगरसेवकांचा सन्मान समारोह संपन्न.
मुंबई : प. पू. आचार्य श्री नयपद्मसागर महाराज जी तसेच साध्वी श्री मयनाश्री जी यांच्या पावन सानिध्यात जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ आणि भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पक्षातून नवनिर्वाचित ३३ जैन नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण व सन्माननीय वातावरणात संपन्न झाला.
या समारंभास मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मा. ना. मंगल प्रभात लोढा, जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्यमंत्री मा. ललित गांधी, आमदार मा. नरेंद्र मेहता, आमदार श्री चैनसुख संचेती, मीरा-भायंदर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती डिंपल मेहता, श्रीमती शायना एन. सी., श्रीमती मंजू लोढा तसेच भाजपा मीरा-भायंदर जिल्हाध्यक्ष श्री दिलीप जैन हे प्रमुख उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित जैन नगरसेवक व भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संबोधित केले.
आपल्या आशीर्वचनांत आचार्य श्री नयपद्मसागर महाराज जी यांनी सांगितले की, धर्ममूल्यांची जोपासना करत राजकारणात जैन युवकांचा सक्रिय सहभाग ही आजच्या काळाची गरज असून, त्यातून समाज राष्ट्रनिर्माणात अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतो.

साध्वी श्री मयनाश्री जी यांनी राजकारणातील नारीशक्तीच्या वाढत्या सहभागाबाबत समाधान व्यक्त करत,
जैन समाजातील अधिकाधिक महिलांची नगरसेवक म्हणून निवड होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नवनिर्वाचित जैन नगरसेवकाना जनसेवेचे स्पष्ट निकष समजावून सांगत, पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी यांचे विचार, विकासनीती व राष्ट्रहिताचा संकल्प जन-जनापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले.
राज्यमंत्री ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत, या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सक्रिय व संवेदनशील भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
आमदार नरेंद्र मेहता व आमदार श्री चैनसुख संचेती यांनी युवकांना संघटनात्मक शिस्त, समर्पण व सकारात्मक कार्यपद्धतीने पक्ष व समाजासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक श्री संदीप भंडारी यांनी सांगितले की, मागील चार वर्षांत भाजपा जैन प्रकोष्ठाने जैन युवकांना संघटित करून राजकीय जागरूकता व चेतना निर्माण करण्याचे सातत्यपूर्ण कार्य केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज भाजपातून ३३ जैन नगरसेवक निवडून आले आहेत. येत्या काळात जैन युवक राष्ट्रकार्यात व राजकारणात अधिक सशक्त भूमिका बजावतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन
श्री वीरेंद्र शाह, श्री घेवरचंद बोहरा, श्री नितिन वोरा, श्री विकास अच्छा व श्री जश वीरा यांनी केले.
समारंभाचे सूत्रसंचालन श्री संदीप भंडारी यांनी केले, तर
आभार प्रदर्शन भाजपा जैन प्रकोष्ठचे महामंत्री श्री विकास अच्छा यांनी केले.

digitalnashik_admin




