ऋतुरंग भवन मध्ये १२ नोव्हेंबर रोजी ' मेहेकी यादे - दीपावली संग ' बहारदार सांज पाडवा गीतांचा कार्यक्रम...

ऋतुरंग भवन मध्ये १२ नोव्हेंबर रोजी ' मेहेकी यादे - दीपावली संग ' बहारदार सांज पाडवा गीतांचा कार्यक्रम...

नाशिकरोड :       एस व्ही कराओके सिंगिंग क्लब, नाशिकरोड  आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे - दीपावली संग '  ( पुष्प १२ वे ) हा बहारदार सांजपाडवा हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम गुरुवार  दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५. ४० वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. यात एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार आहेत.  यात गायक संजय परमसागर यासह विनोद बर्वे, गॉडविन लुईस , दत्तात्रय पाटील, सुदेश आमेसर, डॉ. सुनयना भुजबळ, पद्मा देशपांडे, सुप्रिया बनसोड, स्वप्ना गोखले, स्मिता पोटे, वैशाली राजपूत, मिता सुचक , परमेश्वर चिंतकिंदी, जितेंद्र दिवे , संतोष जोशी, राजेंद्र माळी, प्रितम आमेसर, शाम शहाणे, अनुपमा क्षीरसागर, सुरेंद्रनाथ सोनार, शैलजा सोनार , रोहीत कुलकर्णी आदी गायक आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर  करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन वैशाली राजपूत करणार आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित ३ भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल.  कार्यक्रमास प्रवेश मोफत असून  जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संयोजकांनी कळवले आहे .