डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नाशिक (प्रतिनिधी) डॉक्टर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कार नुकताच डॉ.प्रीती कृष्णा शहाणे यांना प्रदान करण्यात आला आहे.

         डॉ. प्रीती शहाणे यांनी एम्स तेलंगणा येथून एम.बी.बी.एस. पदवी पूर्ण केलेली असून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी संघटना तेलंगणाच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे.

            त्रंबकेश्वर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय डॉ . शिवचरण उज्जैनकर मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार डॉ. शिवचरण उज्जैनकर, प्रा. डॉ. सुभाष बागल, डॉ. रमाकांत जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला.त्यांनी हा पुरस्कार प्रतिनिधी मार्फत स्वीकारला.

डॉ. प्रीती कृष्णा शहाणे ही नाशिक कन्या नुकतीच हैदराबाद येथील AIIMS  या भारत सरकारच्या अत्यंत नामांकित आणि मानांकित संस्थेमधून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण  झालेली आहे. प्रीती कृष्णा शहाणे नाशिक येथील रहिवाशी असून नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ कृष्णा शंकर शहाणे यांची कन्या आहे. बेटी बचाव बेटी पढाव; या विषयावर तिचा खास अभ्यास असून याच विषयावर तिने अनेक ठिकाणी व्याख्याने  दिलेली आहेत.

तिच्या याबहुआयामी कामगिरी बद्दल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या वतीने "नॅशनल एक्सलन्स अँवार्ड" तसेच राष्ट्रीय माणुसकी पुरस्कार अशा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने त्या या पूर्वी सन्मानित झाल्या आहेत.