मार्केटिंग व बाजारभाव हेच आजच्या शेती विकासाचे धोरण असावे

मार्केटिंग व बाजारभाव हेच आजच्या शेती विकासाचे धोरण असावे
मार्केटिंग व बाजारभाव हेच आजच्या शेती विकासाचे धोरण असावे

पिंपळगांव (ब) १८.३.२०२४

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आज शेती क्षेत्रातील अनेक समस्या समोर येत आहे. परंतु या समस्या सोडविण्यासाठी स्वत: पासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेती करताना सेवाभावकर्तव्यनिष्ठतेची जाणीवदेशाविषयी आदर भाव निर्माण व्हावा. यशस्वी शेती उद्दोजक होण्यासाठी आपल्याला स्वत: वाहून घ्यावे लागते. आजच्या नवशिक्षित तरुणांनी शेती करताना बदलले हवामान, जागतिक बाजारपेठ, ग्राहकाची मागणी, आयात- निर्यात धोरण या सर्वांचा अभ्यास करून शेती करावी. आपल्या मालाचे मार्केटिंग आपणच केले तर योग्य तो मोबदला आपल्याला मिळेल. मार्केटिंग व बाजारभाव हेच आजच्या शेती विकासाचे धोरण आहे, असे प्रतिपादन सह्याद्री फार्म संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनाउच्च व तंत्रशिक्षण विभागमंत्रालयमुंबईसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे सिडकोमहाविद्यालय व कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगांव (ब.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचदिवसीय राज्यस्तरीय शिबीरात बीजभाषणपर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागरस्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरेसिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.कुशारेमहाविद्यालायचे प्र.प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगेरासोये जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र आहिरे,  डॉ. गोरक्षनाथ पिंगळे,  प्रा. एस. आर. निकमप्रा एस. टी. घुलेडॉ. मिलिंद थोरातउपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदेप्रा. भगवान कडलग, डॉ. एन. यू. पाटीलप्रा. संपत खैरनार आदी उपस्थित होते.

विलास शिंदे पुढे म्हणाले की, आजच्या नवशिक्षित तरुणानी फक्त नोकरीच्या मागे न धावता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून फायदेशीर शेती करावी. आपापल्या भागात स्थानिक युवकांनी एकत्र येऊन शेती विषयक गंभीर विचार करून संघटितपणे ते सोडवावेत. शेती करून सुद्धा आराम दायी जीवन जगता येतेअशी शास्त्रशुद्ध शेती करावी असे विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी नाशिक जिल्हा हा शेती व्यवसायात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. येथे उत्कृष्ट शेती करणारे आदर्श तरुण आहेत त्याचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा. आज नवतरुणांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्दचिकाटी व परिश्रम घेतले तर शेती यशस्वी करू शकतो. जागतिक बाजारपेठ शोधून योग्य शेतीमाल पुरविला तर शेती क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण होऊ शकतो असे विचार व्यक्त केले.

स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना पारंपरिक शेतीतील अवजारे कालबाह्य होत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पन्न वाढत आहे परंतु त्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा असे विचार व्यक्त केले.  

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. के. कुशारे यांनी शिबीर आयोजनाचा उद्देश व महत्त्व विशद केले. यावेळी रासोये जिल्हा समन्वयक रवींद्र आहिरे यांनी पाच दिवसीय शिबीर कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या सुरुवात कृषी दिंडीने करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीची अवजारे, तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करत आपल्या शेतातील शेती मालाचे प्रदर्शन मांडले होते. कृषी दिंडीच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम यानिमिताने साजरा करण्यात आला. यावेळी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. या पाच दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात ०८ विद्यापीठातील एकूण १२५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.टी. घुले यांनी केले तर प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी आभार मानले. कृषी दिंडी आयोजनामध्ये डॉ. दत्तात्रय फलके, प्रा. अजित देशमुख, प्रा. वृषाली गागरेपाटील, डॉ. निलेश आहेर व सेवक मोगरे काका यांनी परिश्रम घेतले.  यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीशिक्षकशिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.