करंजगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
निफाड (वार्ताहर) :- निफाड तालुक्यातील करंजगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात ग्रामस्थांच्या सहकार्याने व महंत विठ्ठलनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. गोदाकाठचे वारकरी संप्रदायातील भूषण, युवाकीर्तनकार ह.भ.प राहुल महाराज खालकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सातदिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या अखंड हरिनाम सप्ताहात झाली. हभप लक्ष्मण महाराज पाटील (आळंदी), हभप प्रकाश महाराज आव्हाड (दरेवाडी), हभप ऋषिकेश महाराज कुयटे (धानुर), हभप विकास महाराज बीडगर (गंगाखेड), हभप शिवा महाराज आडके (नानेगाव), आळंदी गुरूकुल आश्रमाचे अध्यक्ष हभप शांताराम महाराज गांगुर्डे, हभप योगेश महाराज जाधव (कान्हेरवाडी) हभप सूर्यकांत महाराज सहाने (साकुर) यांची कीर्तने झाली. करंजगावचे ग्रामस्थ राजेंद्रआण्णा राजोळे, नानासाहेब पवार, माणिकराव राजोळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप गायकवाड, सागर जाधव, श्रीराम मित्रमंडळ, सुनील टिळे, विनोद कातकाडे, वासुदेव जाधव व ज्ञानेश्वर बादशाह राजोळे (पाटील) या ग्रामस्थांनी सेवेकरी होत संतभोजन व कीर्तनसेवा घेतली. कीर्तनसेवा घेणारे सर्व ग्रामस्थ तसेच पहारेकरी कैलास कोटकर, निंबा टिळे, विष्णू पगार, भाऊसाहेब टिळे, रामा पावशे, विणेकरी सूर्यभान पवार, गणपत राजोळे, दगडु पिठे, उमेश गांगुर्डे, संपत राजोळे यांनी सप्ताहात सहकार्य केल्याबद्दल हभप राहुल महाराज खालकर यांच्या हस्ते सर्वांना विठुरायाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. करंजगाव व परीसरातील भजनी मंडळाने सप्ताहात सहकार्य केले. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताह यशस्वीतेसाठी सरपंच नंदू निरभवने, बाळासाहेब पावशे, पोपट राजोळे, अर्जुन भगुरे, उद्धव राजोळे, गोविंदआण्णा राजोळे, शहाजी राजोळे, कारभारी पोटे, पार्थ महाराज रायते, तुषार महाराज डेरले, भाऊसाहेब टिळे, दौलत गायकवाड राजेंद्र घायाळ, शंकर लोखंडे, सागर जाधव, वासुदेव जाधव, चंदूकाका राजोळे, माधव गायकवाड, डॉ.प्रमोद वडजे, राहुल कामडे, सोमनाथ ससाणे, शिवाजी आघाव आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.