कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खेड येथे झालेल्या अभिरूप संसद कार्यशाळा स्पर्धेत रूपाली गोळेसर (टी वाय बी कॉम) हिने पटकावले उत्कृष्ट संसदपटू पदाचे पारितोषिक

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खेड येथे झालेल्या अभिरूप संसद कार्यशाळा स्पर्धेत  रूपाली गोळेसर  (टी वाय बी कॉम) हिने पटकावले उत्कृष्ट संसदपटू पदाचे पारितोषिक

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथील तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील  रूपाली गोळेसर हिने मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खेड येथे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत झालेल्या " अभिरूप संसद कार्यशाळा” स्पर्धेत 'उत्कृष्ट संसद पटू ' पदाचे पारितोषिक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष मा श्री उदयभाऊ घुगे, सरचिटणीस मा श्री हेमंतआप्पा धात्रक, सहचिटणीस मा श्री दिगंबर नाना गीते संस्थेचे  विश्वस्त मा श्री नामदेवराव काकड, संस्थेचे संचालक मा श्री हेमंतशेठ नाईक, मा श्री जयंत आव्हाड, श्री समाधान गायकवाड, संचालिका सौ नंदाताई भाबड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले या सर्व मान्यवरांनी कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातून शुभम गांजवे, अजिंक्य बोडके, ओमकार रोडे (टी.वाय.बी.ए.) गायत्री रसाळ, रूपाली गोळेसर, श्रद्धा सुकेनकर(टी.वाय.बी.कॉम) यश सोनवणे (टी.वाय.बी.एस.सी) श्रावण दळवी (एस.वाय.बी.कॉम)

शुभम शर्मा (एफ.वाय.बी.कॉम) इ. विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यांना या स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा. अमोल आव्हाड तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड व सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पुनम कुटे यांचे मार्गदर्शन मिळाले.