सलमान खान स्पेशल कराओके गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न
नाशिक :
साज कराओके, गंगापूर रोड (श्री. श्याम जाधव), एसडी कराओके पंचवटी (सौ. शैला नेरकर), मनीष कराओके क्लब नाशिक रोड (श्री. मनीष अहिरे) आणि आत्मजा डायनॅमिक सिंगर ग्रुप (सौ. नूतन मिस्त्री) या चार नामांकित आयोजकांच्या संयुक्त विद्यमाने सलमान खान स्पेशल कराओके गीतांचा बहारदार व भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
???? परशुराम सायखेडकर, येथे दि. 28/12/2025 रोजी, रविवार सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सलमान खान यांच्या लोकप्रिय गाण्यांवर आधारित सादरीकरणाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले. कलाकारांनी सादर केलेली धमाकेदार गाणी व डान्स परफॉर्मन्स यामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनेक होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उद्देश. अनेक कलाकार केवळ आर्थिक अडचणींमुळे किंवा संधीअभावी मागे पडतात. अशा कलाकारांना योग्य मंच देण्याचे मोलाचे कार्य डॉ. नूतन मिस्त्री मॅडम सातत्याने करीत असून त्यांचे योगदान खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित प्रेक्षकांमधून ५ भाग्यवंत विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक शहरात अनेक कराओके क्लब कार्यरत असले तरी साज कराओके, एसडी कराओके, मनीष कराओके क्लब आणि आत्मजा डायनॅमिक सिंगर ग्रुप या चारही क्लबची एक वेगळीच ओळख आहे. यापूर्वीही अशा अनेक यशस्वी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार व कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

digitalnashik_admin




