NAR, नाशिक व्यवसाय संमेलनात डिजिटल मार्केटिंग व रिअल इस्टेटवर सखोल मार्गदर्शन

NAR, नाशिक व्यवसाय संमेलनात डिजिटल मार्केटिंग व रिअल इस्टेटवर सखोल मार्गदर्शन

नार, नाशिक (Nashik Association of Realtors) यांच्या वतीने दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी नाशिक रोड येथील एव्हीएस टेक्नॉलॉजीज येथे व्यवसाय संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या संमेलनात एव्हीएस टेक्नॉलॉजीजचे श्री. विनोद एस. बर्वे ( Director ,AVS Technologies) यांनी “रिअल इस्टेट व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व” या विषयावर सविस्तर व मार्गदर्शक व्याख्यान दिले. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाइटद्वारे लीड जनरेशन, ब्रँडिंग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसाय वाढ कशी साधता येईल, याबाबत त्यांनी उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली.

याच संमेलनात श्री. मनोज मुखी यांनी रिअल इस्टेट व्यवसायातील प्रत्यक्ष अनुभव सांगत ग्राहक विश्वास निर्माण करणे, नेटवर्किंगचे महत्त्व तसेच संयुक्त व्यवहार (Joint Deals) यावर मार्गदर्शन केले.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री. जितेंद्र राजपूत (अध्यक्ष) होते. यावेळी श्री. राजेश वारुळकर (उपाध्यक्ष), श्री. रितेश कोठाडिया (कोषाध्यक्ष) यांच्यासह नार, नाशिकचे खालील सदस्य उपस्थित होते : श्री. मनीष जोशी, सौ. अल्का दास, श्री. सारंग मेटकर, श्री. ज्ञानेश्वर कवाडे, श्री. मनोज मुखी, श्री. धनेश निचल, श्री. महेश जैन, श्री. नितीन राठी, श्री. राजेंद्र चोरडिया, श्री. अनिल व्यावहारे, श्री. विनय पुनेकर, श्री. कैलाश रावल व श्री. रूपेश चोपडा.

संमेलनात प्रत्येक सदस्याने आपापल्या तीन मालमत्ता किंवा ग्राहकांच्या आवश्यकता मांडल्या. निवासी व व्यावसायिक मालमत्ता, प्लॉट व्यवहार तसेच परस्पर सहकार्याच्या संधींवर सकारात्मक चर्चा झाली.

हे व्यवसाय संमेलन रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व लाभदायक ठरले असून, भविष्यात नार, नाशिकतर्फे अशा प्र