जे डी सी बिटकोच्या अवी यादवची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड
नाशिक रोड : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या दिल्ली येथील CCRT (Center for Cultural Resources & Training) या संस्थेतर्फे दरवर्षी देशभरातून कला, साहित्य, स्थापत्त्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड CCRT शिष्यवृत्तीसाठी केली जाते. 2025-26 या वर्षासाठी देशातील एकूण 634 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्रातील 5 विद्यार्थ्यांची चित्रकला विषयातील भरीव कामगिरीसाठी निवड झाली. केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यामधील कुमार अवी रणजितसींग यादव हा नाशिक रोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, "जे. डी. सी. बिटको इंग्लिश मिडीयम हायस्कुलचा" एकमेव विद्यार्थी आहे. शाळेसाठी हि अभिमानाची बाब आहे. चित्रकला विषयातील भविष्यातील प्रशिक्षणासाठी हि शिष्यवृत्ती उपयुक्त ठरणार आहे.
केंद्र सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करुन शाळेचे नाव उंचावणाऱ्या कुमार अवी यादव याचे आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षिका श्रीमती मानसी सागर यांचे संस्थेच्या सचिव डॉ. दीप्तीताई देशपांडे, मुख्याध्यापक श्री. सोमनाथ जगदाळे, पर्यवेक्षक श्री. शशिकांत त्रिभुवन तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन कौतुक केले आहे.


digitalnashik_admin




