डॉ. राजेंद्र जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान
शिवविजय फाउंडेशनच्या 'स्वा.सावरकर गौरव पुरस्कारांचे वितरण
भगूर:-देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रणशिंग फुंकणाऱ्या स्वा.सावरकरांचे विचार आज घराघरात पोहोचले आहेत. अंदमानात कठोर शिक्षा भोगताना त्यांनी देशहिताचाच विचार केला. हे ठिकाण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याने भारत सरकारने अंदमान-निकोबार बेटावर लष्करी तळ निर्माण करण्याचं ठरवलं. यावरून सावरकरांचं महत्त्व अधोरेखित होते. त्यांच्या देशभक्तीच्या द्रष्ट्या विचारांची आज देशाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी केले.



शिवविजय फाउंडेशनच्या वतीने स्वा.सावरकर जयंतीनिमित्त शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार-२०२६'चे वितरणप्रसंगी शिवाजी चौकात आयोजित सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप मिटके, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर, माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा घुमरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त संदीप मिटके आणि डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आपल्या भाषणात सावरकरांचे कार्य महत्त्वपूर्ण असून सामाजिक समतेच्या दृष्टीने त्यांचे योगदान अद्वितीय आहे, असे गौरवोदगार काढून पुरस्कारार्थींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात विजय करंजकर यांनी स्वा.सावरकरांच्या कार्याचा गौरव करून समाजाला दिशा देणाऱ्या सन्मानार्थींना मानसन्मान हे कर्तृत्वाने मिळत असतात. त्यासाठी सातत्याने त्यांनी कार्यरत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी एकनाथ शेटे, लक्ष्मण सावजी, डॉ.राजेंद्र जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना भगूर नगरीत झालेला हा सन्मान आपल्या माणसांनी केलेला काळजातला सन्मान असल्याचे सांगून जीवनाला दिशा देणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत नाशिक विभागात प्रथम क्रमांकप्राप्त निफाडचे उपकोषागार अधिकारी प्रमोद जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गणेश कासार, मयूर सोनवणे, नितीन करंजकर, तानाजी भोर, अमोल भागवत, शरद कदम, भाऊसाहेब शिरोळे, प्रतिभा शिदगुडे, मंगेश बुरके, विक्रम सोनवणे, अंकुश सोमाणी, योगेश कदम, सुमित चव्हाण, फरीद शेख, चेतन बागडे, प्रशांत कापसे, मनोहर आंबेकर, मनोज कुवर, संदीप गोरे, पंकज कापसे, धीरज वाघ, राहील सय्यद यांच्यासह कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिवविजय फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद घुमरे, आनंद ताजनपुरे, कृष्णा बोरुडे यांनी स्वागत केले. शेखर जाधव यांनी प्रास्ताविक केले. मनोहर आंबेकर यांनी आभार मानले.
यांचा झाला सन्मान...
भगूरचे माजी नगराध्यक्ष एकनाथ शेटे (जीवनगौरव), श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायणशेठ वाजे (सहकार), भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी (राजकीय), माजी मनपा नगरसेवक आणि प्रख्यात सर्जन डॉ.राजेंद्र जाधव (आरोग्य), ज्येष्ठ उद्योजक उत्तमराव शिंदे (उद्योग), भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर (अध्यात्म), साहित्यिक जयेश मेस्त्री (साहित्य), ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे (पत्रकारिता), युवा शेतकरी गणेश निसाळ (कृषी), आंतरराष्ट्रीय क्रीडापटू संग्राम गायकवाड (क्रीडा), महेश पाटील (सामाजिक), चित्रा भवरे (महिला सबलीकरण), एरंडोलच्या 'पुस्तकांचा बगीचा' या अभिनव उपक्रमाचे शिल्पकार आणि छ.संभाजीनगर महापालिकेचे उपायुक्त विकास नवाळे (शासकीय सेवा), उपक्रमशील अध्यापक प्रा.हेमंत टिळे (शिक्षण), नृत्यांगना शिवानी जोशी (कला/संस्कृती), नाशिकरोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती (संस्था).

digitalnashik_admin




