परशुराम सायखेडकर मध्ये ६ जुन रोजी ' बॉलीवूड बिट्स लाईव्ह ऑर्केस्ट्रा ' हिंदी गीतांचा कार्यक्रम

परशुराम सायखेडकर मध्ये ६ जुन रोजी ' बॉलीवूड बिट्स लाईव्ह ऑर्केस्ट्रा ' हिंदी गीतांचा कार्यक्रम

नाशिकरोड :  आत्मजा डायनामिक सिंगर्स आयोजित डॉ. नूतन मिस्त्री प्रस्तुत ' बॉलीवूड बिट्स लाईव्ह ऑर्केस्ट्रा ' या बहारदार हिंदी गीतांचा कार्यक्रम शनिवार  दि.६ जुन रोजी सायंकाळी ५.३० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालिमार, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या मैफिलीत  एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार असून हिंदी  गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता  येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पोतदार करणार आहेत तर संगीत संयोजन जयंत पाटेकर आणि ब्रदर्स करणार आहेत. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित भाग्यवंतास आकर्षक भेटवस्तु दिली जाईल. विश्वशांती हास्य योग समन्वय समितीच्या सौ. जयश्री गावित यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास प्रवेश मोफत असून  जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित रहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आयोजक रोहित मिस्त्री यांनी कळवले आहे .