' मेहेकती यादे ' हिंदी मराठी संगीत मैफिलीत श्रोते दंग.....

' मेहेकती यादे ' हिंदी मराठी संगीत मैफिलीत श्रोते दंग.....

नाशिकरोड :       एस व्ही कराओके सिंगिंग क्लब वतीने  आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकती यादे -आवाज दो हमको हम खो गये ' या अवीट गोडी बहारदार संगीत मैफिलीत नाशिकरोडकर रसिक श्रोते  दंग झाले. रविवारी ( दि. ५ ) सायंकाळी ६ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे रंगलेल्या या मैफिलीत हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल संगम अनुभवायला  मिळाला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी टाळयांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. मैफिलीची सुरुवात गणेश स्तवनाने होऊन  नैनो मे बदरा छाये, सैया दिल मे आना रे, मी वाऱ्याच्या वेगाने आले, कुछ ना कहो, हाय रामा ये क्या हुआ,  मै हु डॉन,  ना जा कही अब ना जा, आवाज दो हमको हम खो गये, जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारी नजर क्यु खफा हो गयी,गाता रहे मेरा दिल, कहो ना प्यार है, चिंब पावसान,  चंद्र आहे साक्षीला, कोयल बोली दुनिया डोली या हिंदी, मराठी गीतांनी वातावरण भारावून टाकले. मराठी गाण्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली.

मैफिलीत गायक संजय परमसागर यासह गॉडविन लुईस, वनिता आहेर, कैलास कपाटे, रेखा ठाकूर,  अनिल व्यवहारे, ßमोनाली सारंगधर, मोहन निकम, जितेंद्र देवरे, योगिता जोहरी, अनुपमा क्षीरसागर, शांताराम घुगे, जयवंत गांगुर्डे, स्वप्ना गोखले, प्रज्ञा गोपाळे , संजय दुलगज, अनिल पांचाळ, सुदेश आमेसर, अस्मिता कुलकर्णी ,यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यात  अफलातून ग्रुपचे हरीशभाई ठक्कर, प्रकाश गोसावी,अनिल पोटे,  अक्षय फाउंडेशनच्या मोनादीदी, प्रमोद कापडणे,  डॉ. कृष्णा शहाणे, दिनेश गोविल, शैलेश सोनार, रुपेश शिंपी, संविधान कराओके क्लबचे राजन गायकवाड,सुभाष बोराडे, मोहनभाऊ पवार, डॉ. माधुरी जाधव, डॉ. राजेंद्र pजाधव, प्रा राजेंद्र जोगी, डॉ. सुरेखा जोगी, ज्योती धुमाळ, किशोर वडनेरे यासह रसिक उपस्थित होते. तंत्र सहाय्य एव्हीएस टेकनॉलॉजिजचे संचालक श्री. विनोद बर्वे तर ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन रोहिणी सोनार यांनी काव्यशैलीत  खुमासदारपणे  करत खिळवून ठेवले.