ऋतुरंग भवन मध्ये ३० ऑगस्ट रोजी ' मेहेकी यादे - मनचाहे गितोंके साथ ' बहारदार गीतांचा कार्यक्रम...
नाशिकरोड : एस व्ही कराओके सिंगिंग क्लब, नाशिकरोड आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे - मनचाहे गितों के साथ ' या बहारदार संगीत मैफिलीचे ( पुष्प ९ वे ) रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या मैफिलीत एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार असून विविध आवडत्या हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे . या सांगितिक मैफिलीत गायक संजय परमसागर यासह विनोद बर्वे, गॉडविन लुईस, वनिता आहेर , दत्तात्रय पाटील, डॉ. सुनयना भुजबळ, स्वप्ना गोखले, वैशाली राजपूत, उज्वला वैद्य, अनिल धानापुणे, अर्चना धानापुणे, विठ्ठल श्रीवंत, प्रितम आमेसर, अनुपमा क्षीरसागर, अनिल गुरव, रोहीत कुलकर्णी, शालिनीताई भालेराव, पद्मा देशपांडे,नेहा वालेजा, विमल लालचंदानी, अर्चना पगारे आदी गायक आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन नीता देशमुख करणार आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित ३ भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल. कार्यक्रमास प्रवेश मोफत असून जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संयोजकांनी कळवले आहे .

digitalnashik_admin




