निपम चा 46 वा स्थापना दिन महिलांचा सन्मान करून उत्साहात साजरा

नाशिक - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट चा 46 वर्धापन दिन मनुष्यबळ विकास क्षेत्रात बेस्ट प्रॅक्टिसेस कारणीत करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करून साजरा करण्यात आला.मनुष्यबळ विकास क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करू असे प्रतिपादन निपम अध्यक्ष राजाराम कासार यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले . यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉक्टर फोरम पारीख मेहता, नाशिकच्या प्रसिद्ध सिने कलावंत स्मिता प्रभू, निपम चे उपाध्यक्ष राहुल बोरसे, उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव प्रकाश गुंजाळ, सहसचिव राजेंद्र आचारी, खजिनदार सुस्मित दळवी कार्यकारणी सदस्य मनोज मुळे, ब्रिजेश जाधव, श्रीकांत पाटील, जनार्दन शिंदे, रामेश्वर थोरात, यादवी पवार, हर्षदा सोनवणे, विनेश मोरे, गोविंद बोरसे, अँडव्होकेट राजश्री महेंद्र जानोरकर, डॉक्टर प्रकाश पारीख आदी उपस्थित होते . कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने कलावंत स्मिता प्रभू यांनी महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात त्या म्हणाले की यशाची शिखरे गाठायची असतील तर अगदी छोट्या छोट्या आवाहनांना पेलत मोठे आव्हान पेलण्याची ताकद निर्माण होते आणि मग यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात त्यासाठी न डगमगता महिलांनी आव्हाने स्वीकारला पाहिजे आपले उद्दिष्टे नक्की साध्य होतील. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी थोडक्यात आपली संघर्ष कथा महिलांसमोर मांडली.
या कार्यक्रमात प्रसिद्ध श्री रोग तज्ञ डॉक्टर फोरम मेहता यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व त्याविषयी घ्यायची काळजी यावर विशेष मार्गदर्शन केले व उपाययोजना यावरही त्यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सत्कार सोहळ्यात आपापल्या कारखान्यांमध्ये बेस्ट एच आर प्रॅक्टिसेस राबविणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. इंडियन पेन्स व स्टेशनरी च्या वर्षा वाघ, जिंदाल पॉली फिल्मच्या तेजश्री सावळे, ऑटो सेल इलेक्ट्रो मेक च्या भारंबे, एम्पायर स्पाइसेस च्या लीना शिंदे, अभिजीत टेक्नो प्राइवेट लिमिटेड च्या प्राजक्ता मोराडे, मेमको इंजिनिअरिंगच्या मनीषा कुलकर्णी, सहानी इन्सुलेशन ग्रुपच्या दिपाली सावदेकर, डिस्टल एज्युकेशनच्या ऐश्वर्या सांगळे यांना त्यांच्या मनुष्यबळ विकास क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत श्रीकांत पाटील यांनी केले, फोरम मेहता पारीख यांचा सत्कार यादवी पवार यांनी केला, स्मिता प्रभू यांचा सत्कार हर्षदा सोनवणे यांनी केला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकांत पाटील , राजेंद्र आचारी , यादवी पवार , हर्षदा सोनवणे , रामेश्वर थोरात , विनेश मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शंभरहून अधिक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे पास्तविक निपम चे सचिव प्रकाश गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन यादवी पवार व श्रीकांत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बोरसे यांनी केले.