गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक कॅम्पसमध्ये केंद्रीकृत भरती मोहिमेचे उद्घाटन....
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीकृत प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलतर्फे आयोजित दोन दिवसीय भरती मोहिमेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमास मान्यवर, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीच्या सचिव व खजिनदार तथा सेलच्या अध्यक्षा डॉ. सौ. दीप्ती देशपांडे होत्या. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, प्रकल्प संचालक प्रा. पी. एम. देशपांडे, आस्थापना संचालक श्री. शैलेश गोसावी, गुणवत्ता व प्रणाली संचालक तसेच सेलचे संचालक श्री. अक्षय देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, तसेच सेलच्या समन्वयक डॉ. सरिता औरंगाबादकर, डॉ. लीना भट व डॉ. संतोष अग्निहोत्री, विविध महाविद्यालयांचे प्रशिक्षण व प्लेसमेंट समन्वयक, प्राचार्य, उपप्राचार्य आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
१०८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे केजी ते पीजी व डॉक्टरेटपर्यंत ३ विभागांत २४० अभ्यासक्रमांद्वारे गुणवत्तापूर्ण व मूल्याधारित शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीस अधिक बळकटी देण्यासाठी डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीकृत प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, इंटर्नशिपची व्यवस्था करणे, कौशल्यविकास कार्यक्रम राबविणे, करिअर मार्गदर्शन, उद्योग-संवाद वाढविणे आणि ऑन-कॅम्पस व ऑफ-कॅम्पस भरती मोहिम आयोजित करणे ही या सेलची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या दोन दिवसीय भरती मोहिमेत ४० हून अधिक नामांकित कंपन्यांचे सुमारे ८० ते १०० मानव संसाधन प्रतिनिधी सहभागी झाले असून सुमारे ८०० विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. शैक्षणिक क्षेत्र व उद्योग क्षेत्र यांतील दरी कमी करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी भरती मोहिमेचे औपचारिक उद्घाटन करून या उपक्रमाला यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या.

digitalnashik_admin




