के व्ही एन नाईक महाविद्यालयात MPSC–UPSC मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
सिन्नर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने MPSC, UPSC तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष करिअर पॉईंटचे संचालक सतीश भडांगे उपस्थित होते
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षांबाबत आयोगांचा बदलता दृष्टिकोन” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या बदलत्या स्वरूपानुसार अभ्यासाचे नियोजन, परीक्षेची तयारी, प्रश्नपत्रिकेचा बदलता कल, चालू घडामोडींचे महत्त्व आणि योग्य अभ्यासपद्धती याबाबत तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला महाविद्यालयातील विविध शाखांमधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी लक्ष करिअर पॉईंटचे संचालक श्री सतीश भडांगे सर यांच्याशी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षांसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले.
व स्पर्धा परीक्षा बद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागप्रमुख संतोष आव्हाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केला. या कार्यक्रमासाठी लक्ष करिअर पॉईंटचे समन्वयक भुषण देवरे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुतन पाटील यांनी केले तर आभार पुनम कुटे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

digitalnashik_admin




